आपलं शहर

Maharashtra: पुढील 48 तासात राज्यात लॉकडाऊनचा इशारा

Maharashtra: राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढत आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे.अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. येत्या 2 दिवसात राज्यात लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी जनतेशी व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे संवाद साधला तेव्हा त्यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर बोट ठेवलं.येत्या दोन दिवसांत ते विविध राजकीय पक्ष, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार आदी लोकांशी चर्चा करणार आहेत. लॉकडाऊन नको तर दुसरा उपाय काय? याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

येत्या 2 दिवसात राज्यात कोरोनाची नवीन काय परिस्थिती असेल यावर लॉकडाऊनचा निर्णय घेणार.

राज्यात आता दिवसाला 40 हजार पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत त्यामुळे रूग्नयंत्रणेवर (medical system) ताण येत आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर येत्या 10-15 दिवसात सध्या असलेली यंत्रणा अपुरी पडेल.रुग्णालये, बेड्सची संख्या वाढवता येईल पण डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हे कमी पडतील. अशा परिस्थितीत लोकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

राज्यात लॉकडाऊन लावला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा विरोधकांकडून (opposition) दिला जात आहे. मी म्हणतो आता रस्त्यावर उतराच. आता सगळ्यांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पण रस्त्यावर उतरायचं ते आंदोलन, मोर्चांसाठी (protest) नाही. तर लोकांच्या सेवेसाठी असही मुख्यमंत्री म्हणाले

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments