कारण

Maharashtra Lockdown update ।आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार

Lockdown च्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार असून महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकत असल्याने त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातील झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.(Maharashtra Lockdown update Chief Minister Uddhav Thackeray address state today on the outbreak of corona)

अस्लम शेख यांनी दिला Lockdown चा संकेत .

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची (Maharashtra Lockdown) घोषणा होण्याची शक्यता असून त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली (Maharashtra Lockdown guidelines) ही आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी आज मत व्यक्त केले आहे .

महाराष्ट्रात 12-13 दिवसांचा लॉकडाऊन?

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ महाराष्ट्रात लॉकडाऊन 12 ते 13 दिवसांचा असू शकतो असे संकेत दिले आहेत . राज्यातल्या परप्रांतिय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका. तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकार आणि कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र तुमची काळजी घेईल याचं आश्वासन देतो, असं मुश्रीफ म्हणाले होते.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

लॅाकडाऊनमध्ये जिल्हाबंदीपासून इतर कडक निर्बंध असतील. लॅाकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी अंमलबजावणी होणार आहे. लोकांना तयारी करण्यासाठी वेळ दिला जाईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वजेट्टीवार यांनी दिली आहे .

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments