आपलं शहर

Maharashtra: मुंबईत कोरोनाचा हाहाकार, एका दिवसात सगळ्यात जास्त 8,646 रुग्ण

Maharashtra: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने हाहाकार केला आहे.दरम्यान, गुरुवारी मुंबईत 8,646 नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. साथीच्या आजारानंतर दिवसभरात ही सर्वाधिक नोंद झाली आहे. 28 March मार्च रोजी शहरात 6,923 रुग्णांची नोंद झाली असून आजपर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.

मुंबईत यावर्षी मार्च मध्ये 88,710 रुग्ण सापडले आहेत.जी फेब्रुवारी महिन्यात नोंदविण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपेक्षा 475 % जास्त आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी ही माहिती दिली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात शहरात 18,359 रूग्ण असून जानेवारीत ही संख्या 16,328 होती. याचाच अर्थ मार्चमध्ये मुंबईत मागील महिन्याच्या तुलनेत 70,351 अधिक प्रकरणे पाहायला मिळाली.

कोरोनामुळे जानेवारीमध्ये 237 तर मार्चमध्ये 216 आणि फेब्रुवारीमध्ये 191 लोकांना आपला जीव गमवावा लागला. 31 मार्चपर्यंत शहरातील संक्रमित लोकांची संख्या 4,14,714 पर्यंत वाढली होती तर मृतांची संख्या 11,686 वर पोचली आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार 31 मार्च रोजी ,51,411 रुग्णांवर उपचार सुरू होते तर फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत 9,715 रुग्णांवर उपचार सुरू होते.

महाराष्ट्र बद्दल बोलायचं झालं तर या वर्षी कोरोनाचे एकुनमिळून 6,51,513 रुग्ण सापडले आहेत जे गेल्या 5 महिन्यात सापडलेल्या रुग्ण संख्येपेक्षा 88.23% जास्त आहे. गेल्या वर्षी पेक्षा 2021 मध्ये रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.याच मुख्य कारण म्हणजे लोक नियमांच पाळण नाही करत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments