आपलं शहर

Maharashtra Anil Deshmukh CBI inquiry : परमबीर सिंहांसह देशमुखांच्या चौकशीसाठी CBI मुंबईत…

Maharashtra: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांच्या चौकशीसाठी दिल्लीहून सीबीआयची एक टीम आज (मंगळवारी) मुंबईला भेट देईल. येथे सीबीआय परमबीर सिंग यांचे निवेदन जितक्या लवकरात लवकर नोंदवेल आणि या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रेही संकलित करेल. सीबीआयचे संचालक या प्रकरणाची देखरेख ठेवतील. मात्र, सीबीआयने याक्षणी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.

येत्या पंधरा दिवसांत सीबीआयला अहवाल द्यावा लागेल, त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर नोंदविला जाईल, असा निर्णय होईल.परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करत बॉम्बे हाय कोर्ट ने 100 करोडच्या वसुलीच्या आरोपांची तपासणी सीबीआय करेल असं सांगितलं.

अँटिलीया प्रकरणात मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाजे यांचे नाव आल्यानंतर उद्धव सरकारवर प्रश्न उपस्थित होऊ लागले.त्यात मुंबई कमिशनर परमबीर सिंग यांची बदली केली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं ज्यात त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 करोडच वसुली टार्गेट पूर्ण करायला सांगितलं असा लिहिलं होत.त्यांनतर उद्धव ठाकरे सरकार विवादात आली.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments