खूप काही

महेंद्रसिंह धोनीवर दु:खाचे सावट, घरातील दोन जवळच्या व्यक्तींना कोरोना

महेंद्रसिंह धोनीच्या घरात देखील कोरोनाचा प्रवेश..

चेन्नई सुपर किंगचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या घरातही कोरोनाने केला प्रवेश. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी यांना देखील कोरोनाची लागण झाली असून. त्यांच्यावर रांचीमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

धोनीचे आई वडील जिथे उपचार घेत आहेत तिथून अशी माहिती समोर आली आहे की, ते सध्या ठीक आहेत. त्यांचा ऑक्सिजन लेवल देखील ठीक आहे. कोरोना संसर्ग फुफ्फुसापर्यंत पोहोचलेला नाही. सिटीस्कॅन काढल्यानंतर त्याची माहिती मिळाली. त्यामुळे कोरोना संसर्गातून दोघे लवकरच बरे होतील अशी आशा आहे.(mahendra singh dhoni’s parents tested Covid-19 positive)

अशा परिस्थितीत देखील धोनी मुंबई आयपीएल खेळत आहे. मुंबई येथील वानखेडे मैदानावर आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना कोलकता नाइटरायडर्सशी होणार आहे. दरम्यान आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आज देशात 2 लाख 95 हजार 041 नव्या रुग्णांची वाढ झाली असून 2,023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments