आपलं शहर

Maharashtra restrictions: अशा प्रकारे असतील महाराष्ट्रातील नवे निर्बंध…

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात नवे निर्बंध

महाराष्ट्रातील कोरोना हा नियंत्रणात नाही.त्यामुळे राज्यात दररोज नवीन प्रकरणे दाखल होत आहेत. आजपासून राज्यात नाईट कर्फ्यूसह अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन अनेक नवीन निर्बंधांची घोषणाही केली. कलम 144 राज्यात लागू असेलच. त्याचबरोबर रात्री 8 ते सकाळी 7 या दरम्यान रात्री कर्फ्यू(Night Curfew) असेल. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.तसेच आठवड्याच्या शेवटी (शनिवार व रविवार)(Weekend Lockdown) लॉकडाउन ची घोषणा केली. मुंबई – टॅक्सी, बस,(Mumbai Taxi Bus New Rules) यासाठी नवीन अटी लागू केले आहेत. नव्या आदेशानुसार रिक्षामध्ये दोन लोक आणि टॅक्सी 50 टक्के क्षमतेसह धावतील. त्याचप्रमाणे आपण यापुढे बसमध्ये उभे राहून प्रवास करू शकत नाही.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी नुकतीच लोकल सेवांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर असे सांगितले की, ‘लोकल ट्रेन या पुन्हा एकदा फक्त अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच मर्यादित ठेवण्यात येतील’.परंतु मुंबईतील वाढत्या प्रकरणांमागील कारण म्हणजे सर्व लोकांसाठी स्थानिक सेवा सुरू केल्यामुळे कोरोना वाढत आहे असा ठपका लावण्यात आला आहे.दरम्यान, CNBC TV18 ने बीएमसीचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, मुंबई लोकल ट्रेन आतापर्यंत थांबविण्याचे अद्याप कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. तथापि, सरकार येत्या दोन आठवड्यांमध्ये (15 दिवस) परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

1)पहिल्या लोकलपासून ते सकाळी 7 पर्यंत – सामान्य लोक प्रवास करू शकतील.
2)सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत – आवश्यक सेवांमध्ये व्यस्त असलेले लोक प्रवास करतील.
3)दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत सामान्य लोक प्रवास करू शकतील.
4)आवश्यक सेवांमध्ये व्यस्त असलेले लोक संध्याकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत प्रवास करतील.
5)सामान्य लोकांना रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मुभा दिली जाईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments