फेमस

IPL 2021 : माइकेल वॉनची भविष्यवानी, मुंबई इंडियन्स नाहीतर IPL जिंकेल ‘हा’ संघ…

नुकतेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा IPL 2021 चे विजेतेपद पटकावले, असा अंदाज वर्तविला आहे.

मुंबई IPL 2021 सुरू होण्यास अजून फक्त एक दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे IPL चं घमासान सगळीकडे रंगताना दिसत आहे. चौदाव्या सत्राचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या नेतृत्व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात 9 एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. आयपीएलची सुरुवात ही अद्याप झालेली नाही आणि काही क्रिकेट तज्ञांनी आयपीएल 2021 च्या विजेताचा अंदाज वर्तविण्यास सुरुवात केला आहे.

नुकताच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावेल, असा अंदाज वर्तविला आहे. यासह तो म्हणाला की, जर मुंबई इंडियन्स हे सत्र विजय होत नसेल तर डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद संघ दुसऱ्यांदा विजेतेपद पटकवू शकेल, अशी शक्यता त्याने वर्तवली आहे. हैदराबादने 2016 च्या अंतिम सामन्यात आरसीबीला पराभूत करून पहिले विजेतेपद जिंकले.

मायकेल वॉनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्स जिंकतील; जर मॅचमध्ये उतार चढाव झाले, तर सनरायझर्स हैदराबाद जिंकेल”. मायकेल वॉननेही मुंबई इंडियन्स संघाच्या विजयाचा अंदाज वर्तविला आहे, कारण त्याची टीम प्रत्येक विभागात परिपूर्ण आहे आणि आतापर्यंत 13 पैकी 5 विजेतेपद जिंकले आहेत.

मुंबई विजयी होण्यापूर्वी, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने 2010 आणि 2011 मध्ये सलग दोन विजेतेपद जिंकले. परंतू सलग तीन विजेतेपद मिळविण्यात तो अपयशी ठरला.

असा असेल मुंबई इंडियन्स संघ :

मुंबई इंडियन्स संघ – रोहित शर्मा, आदित्य तारे, अनमोलप्रीतसिंग, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, नॅथन कुलपर नाईल, पियुष चावला, अ‍ॅडम मिलने, जेम्स नीशम, अर्जुन तेंडुलकर, मार्को जानसेन, युद्धवीर सिंग, जयंत यादव, किरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बाउल्ट.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments