खूप काही

Mumbai news : CIU च्या प्रमुखपदी मिलिंद काठे यांची नियुक्ती

सचिन वाझे यांना निलंबित करून त्यांची जागा आता मिलिंद काठे यांना दिली आहे.

एक काळ होता जेव्हा मुंबईमध्ये 4 CIU होत्या. परंतु आता एकच उरली आहे. ज्याचे ऑफिस मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये आहे.

मुकेश अंबानी घरा बाहेर स्फोटक ठेवल्याच्या आरोपामुळे सचिन वाझे यांना निलंबित करून त्यांची जागा आता मिलिंद काठे यांना दिली आहे. सचिन वाझे यांच्यामुळे क्राईम इंटेलिजन्स युनिटने मंगळवारी रात्री मिलिंद काठे यांना मुख्य पदासाठी नियुक्त केले. त्यांनी खूप काळ महाराष्ट्र एटीएस मध्ये देखील काम केले आहे.(milind kathe crime branch appointed CIU chief replacing sachin vaze)

25 फेब्रुवारीला सचिन वाझे यांनी स्फोटक असणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला त्यांच्या ड्रायव्हरच्या मदतीने पार्क केली होती व त्या स्कॉर्पिओ मागे उभ्या असणाऱ्या इनोव्हामध्ये स्वतः सचिन वाझे बसले होते. या स्फोटक प्रकरणाचा तपास ज्या अधिकाऱ्यांनी केला त्यात स्वतः मिलिंद कोठे यांचाही समावेश होता. सचिन वाझे प्रकरणात एन आय एन ने कोठे यांची देखील चौकशी केली होती आणि त्याचा जबाबही घेतला होता.

सचिन वाझेच्या आधी CIU चे मुख्य विनय घोरपडे होते. मिलींद मधुकर काठे हे गुन्हेगारी शाखेच्या कक्ष-दोन चे निरीक्षक होते. मुकेश अंबानी धमकी प्रकरणानंतर गुन्हे शाखेतील 65 जणांच्या बदलीनंतर या युनिटला आणखीन 24 अधिकारी मिळाले. तसेच वाझे यांच्या रिक्त झालेल्या जागी पोलीस मिलिंद काठी यांच्याकडे सी आय यु ची पूर्ण जबाबदारी दिली. याशिवाय युनिट-तीनचे पोलिस योगेश चव्हाण यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची जबाबदारी सोपवण्यात आली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments