खूप काही

Mumabi Corona update | मुंबईत दुसरी लाट ओसरली, रुग्णांची सगळ्यात कमी नोंद

मुंबईत कोव्हिडच्या 5,542 नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत, एप्रिलमधील आतापर्यंतची ही सर्वात कमी नोंद आहे.

रविवारी मुंबईत 5,542 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून गेल्या काही महिन्यांत होणार्‍या संक्रमणामध्ये आजपर्यंतची ही सर्वात कमी वाढ आहे, असे महानगरपालिकेने म्हटले आहे. यामुळे शहराच्या कोव्हिड-19 रुग्णांची संख्या 6,27,651 वर गेली. शनिवारी त्यात 5,888 रूग्णांची नोंद केली गेली असून त्यात रविवारी घट झाली आहे.

31 मार्च रोजी मुंबईत 5,394 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, परंतु दुसर्‍या दिवशी हा आकडा 8,000 च्या वर गेला होता. 12 एप्रिलनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रूग्णांची संख्या 7,000 पेक्षा कमी आहे.बृहन्मुंबई महानगरपालिके(BMC)च्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार , रविवारी कोरोनाने 64 रूग्णांचा बळी घेतले.मृतांच्या एकूण संख्येपैकी 28 महिला आहेत.

यासह मुंबईत मृत्यूची संख्या 12,783 वर गेली आहे. तर दिवसभरात एकूण 40,298 लोकांची चाचणी करण्यात आली, ज्याने एकूण मोजणी 52,43,734 वर आणली आहे.याचबरोबर मुंबईत कोरोना वाढीचा 18 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यानचा दर हा 1.17 टक्के आहे .

रविवारी मुंबईत 8,478 रूग्ण कोरोना संक्रमित झाले असून शहरातील 5,37,711 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटीव्ह रुग्णांची ची संख्या आता 75,740 आहे. तर मुंबई जिल्ह्याचा पुनर्प्राप्ती (Recovery )दर 86 टक्क्यांपर्यंत आहे.

दरम्यान, रविवारी नागपुरात 3,74,188 लोकांची कोरोना टेस्ट झाली असून 7,771 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह (positive)आढळून आले आहेत तर त्या दिवशी 87मृत्यू आणि 5,130 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

जिल्ह्यात रविवारी 24,701 लोकांची तपासणी करण्यात आली असून नागपुरातील कोरोना चाचण्यांची संख्या 21,58,397 वर पोहचली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात एकूण 66,191 नवीन कोरोना प्रकरणे उद्भवली असून, 61,450 रूग्णांना डिस्चार्ज (discharge) आणि 832 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे .

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments