खूप काही

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला एक महिन्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय

मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने आयआरसिटी ने मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणारी तेजस एक्सप्रेस पुढील एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने आयआरसिटी ने मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर धावणारी तेजस एक्सप्रेस शुक्रवार दिनांक 2 पासून ते पुढील एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गाडीचे तिकीट असणाऱ्या प्रवाशांना लवकरच पैसे रिफंड करण्यात येतील.

तेजस एक्सप्रेसला मागील वर्षाच्या मार्चपासून ते ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. नोव्हेंबर मध्ये प्रवाशांची संख्या कमी असल्याने ही एक्सप्रेस पुन्हा काही काळ बंद करण्यात आली होती. त्यानंतर ही एक्सप्रेस 14 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ झाली असल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले. त्यात तेजस एक्सप्रेस देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Mumbai-Ahmedabad Tejas Express suspended for one month)

24 तासात महाराष्ट्रामधल्या 43 हजार 183 रुग्णांची संख्या 28 लाख 56 हजार 163 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रात 249 रुग्णां चा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे
येत्या 2 दिवसात राज्यात लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्राबरोबरच अहमदाबादमध्ये देखील एक दिवसात 626 नवीन रुग्णांची संख्या वाढली असून सुरतमध्ये रुग्णांची संख्या 615, वडोदरा मध्ये 363 आणि राजकोट मध्ये 223 नवीन रुग्ण सापडले आहेत.

गुजरात मध्ये देखील एका दिवसांमध्ये 2 हजार 410 नवीन रुग्णांची भर पडली असून पूर्ण राज्यामध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 3 लाख 10 हजार 108 पर्यंत जाऊन पोहचली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments