खूप काही

Mumbai Corona update | कोरोनाने मुंबई बेहाल, सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्येही बेड्सचा पत्ता नाही…

मुंबईतील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांना बेड्स पडले अपूरे

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे. याचे परिणाम मुंबईतील सर्वात मोठे कोविड सेंटर असलेल्या नेस्को (NESCO) हॉस्पिटलवरही दिसुन येत आहेत. व्हेंटिलेटर्सपासून आयसीयू आणि जनरल वॉर्डपर्यंत सर्व बेड्स रूग्णांनी भरलेले आहेत.

मुंबईतील सर्वात मोठ्या कोविड सेंटर म्हणजेच नेस्को (NESCO )हॉस्पिटलमध्ये 2 हजार अद्ययावत बेड्स आहेत आणि त्या प्रत्येक बेडवर कोरोनाचे रुग्ण आयुष्य आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढताना दिसत आहेत. आयसीयू (ICU) वॉर्डात तर अतिशय वाईट परिस्थिती आहे, कोणतेही बेड रिकामी नाहीत, 15 आयसीयूंचे सर्व बेड्स रूग्णांनी भरलेले आहेत, तरीही डॉक्टर आणि इतर कर्मचारी सतत 12-15 तास काम करून रूग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आयसीयू( ICU) नंतर एचडीयू (HDU) वॉर्डमध्येदेखील तीच परिस्थिती आहे. रुग्णांची संख्या खूप जास्त असल्याने आयसीयू (ICU) च्या रूग्णांपेक्षा कमी गंभीर रूग्णांना एचडीयू (HDU) वॉर्डात ठेवले जात आहे. यासर्व परिस्थितीत डॉक्टर आणि सर्व कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असतात.

आता कोरोनाच्या नव्या रुग्णांचे सामान्य (General) वॉर्डत नोंदणी करतात. परंतू सामान्य (General) वॉर्डमध्ये क्वचितच बेड्स शिल्लक आहेत, बाकी संपूर्ण General वॉर्ड रुग्णांनी भरलेले आहे. त्यामुळे दुसर्‍या हॉलमध्ये आणखी बेड लावण्याची तयारी सुरू आहे. यावेळी ऑक्सिजनचा पुरवठाही केला जात आहे.

मृतांची संख्येत दिवसेंदिवस वाढ

कोरोना इतका धोकादायक आहे की संपूर्ण कुटुंबाला मारू शकतो. नेस्को हॉस्पिटलची वॉर्ड गर्ल प्रियांकाने सांगितले की मृत शरीरात जास्त व्हायरस आहे त्यामुळे एखाद्याच्या मृत्यूनंतरही त्यांचे कुटुंब अंंत्यसंस्कार करू शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.

नेस्को कोविड सेंटरच्या डीन डॉ. नीलम अँड्राडे यांच्या म्हणण्यानुसार, ‘रूग्ण बरेच आहेत, बेड रिक्त नाहीत, आम्ही ऑक्सिजनची सर्व आवश्यकता पूर्ण करत आहोत, पण आता कर्मचारी वर्ग खचला आहे, रूग्णांपेक्षा जास्त दबाव कर्मचारी वर्गावर आहे, पण सर्व डॉक्टर आणि कर्मचारी जबाबदारीने काम पार पाडत आहेत. नागरिकांनीही जबाबदारीने वागले पाहिजे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments