आपलं शहर

Mumbai: लॉकडाऊनच्या शंकेने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर वाढली गर्दी, मध्य रेल्वेने सुरू केल्या नवीन ट्रेन

Mumbai: महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाची प्रकरणे (Maharashtra corona cases) आणि लॉकडाऊनचा धोका लक्षात घेता उत्तर-भारतीय लोक आणि मुंबईत राहणारे प्रवासी मजूर आता आपल्या मायदेशी परतले आहेत. उत्तर-भारतकडे जाणाऱ्या गाड्यांची वाट बघत मुंबईतील सर्व स्थानकांवर लोकांची उपस्थिती नोंदविली जात आहे.

राज्यात नाईट कर्फ्यू आणि शनिवार व रविवार लॉकडाऊनमुळे लोकांच्या मनात भीती पसरली आहे.गेल्या लॉकडाऊनमध्ये झालेली वणवण लोक अजून विसरले नाहीत.या वेळेस लोकांना कोणता रिस्क नाही घ्यायचाय.

लोकांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेनेही ( central railway) लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढविली आहे जेणेकरुन लोकांना अधिक त्रास सहन करावा लागू नये. मध्य रेल्वेनेही एप्रिलपासून उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही नवीन गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे.

01067 आणि 01017 साठी बुकिंग 7.4.2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडण्यात येईल. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments