खूप काही

Video : कोरोनाला हलक्यात घेऊ नका, Live व्हिडीओमध्ये डॉक्टर झाल्या भावूक; पाहा व्हिडीओ

महिला डॉक्टरने भावनिक होऊन आपण असहाय्य असल्याची खंत केली व्यक्त

देशात कोरोनाने कहर केला असून कोरोनाच्या विळख्यात अडकून अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. जनतेने मास्कचा वापर करावा आणि स्वतःची काळजी घ्यावी यासाठी अनेकदा त्यांना सांगावे लागत आहे व मास्क नसल्यास फाईन घ्यावा लागत आहे.

मुंबईमधील एका डॉक्टरचा कोरोनाबद्दलचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होतोय. ज्यामध्ये एक महिला डॉक्टर आपल्याला ती असहाय्य असल्याचे सांगत आहे. कृपया मास्क वापरा. देशात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आणि भयानक परिस्तिथी याच्याबद्दल सांगताना रोग विशेषज्ज्ञ डॉ. तृप्ती गिल्डा या भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. या डॉक्टरने अतिशय भावनिक व्हिडिओ शेअर केला असून लोकांनी पॅनिक न होता मास्कचा वापर करावा असे सांगितले आहे.(Mumbai doctor’s emotional appeal to public to take COVID-19 seriously)

डॉक्टरने सांगितले की, मी कधीच असा रोग बघितला नाही. आता आम्ही असहाय्य आहोत. अनेक डॉक्टरांसारखं मी देखील आता वैतागली आहे. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन आणि महत्त्वपूर्ण औषधांची कमी निर्माण झाली आहे. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने गंभीर स्थिती असलेले रुग्णही घरातून उपचार घेत आहेत’. त्या पुढे म्हणाल्या की, ”मी कधी असं पाहिलं नाही, आम्ही हतबल आहोत,.. इतर डॉक्टरप्रमाणे मीही चिंतीत आहे. मला माहिती नाही मी काय केलं पाहिजे”. ‘जर मी तुमची मदत करू शकले तर मला समाधान वाटलं असतं’.

जर तुम्हाला आत्तापर्यंत कोरोना झालेला नसेल किंवा कोरोना होऊन तुम्ही त्यावर मात देऊन तुम्ही ठीक झाला असाल तर तुम्ही सुपरहिरो आहात असे समजू नका. आम्ही दिवसेंदिवस अनेक तरुणांना संक्रमित होताना पाहतोय. आमच्याकडे 35 वर्षाचे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत आणि आम्ही त्यांना मदतही करू शकत नाही.

याचबरोबर डॉक्टरने हे देखील सांगितले की, सर्व डॉक्टर आता असहाय्य आहेत. त्यामुळे लोकांना आता मास्क वापरणे अतिशय गरजेचे आहे. आणि कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा कोरोनाची लक्षण जाणवत असतील तर घाबरून जाऊ नका. सगळ्यात पहिलं स्वतःला क्वारंटईन करून घ्या. आणि आपल्या डॉक्टरच्या संपर्कात राहा व त्यांच्या सल्ल्यांचे पालन करा. त्याचबरोबर डॉक्टरने सांगितले की, कोरोनाला हलक्यात घेऊ नका. आणि जे रुग्ण आता कोरोना संक्रमित आहेत ते ठीक होण्यासाठी प्रार्थना करा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments