फेमस

IPL 2021 : Hardik Pandya ठरू शकतो Mumbai Indians ची डोकेदुखी…

हार्दिक पांड्याच्या खराब खेळीमुळे मुंबई इंडियन्स संघाला निराशा मिळत असल्याचे संजय मांजरेकरांनी म्हटलं आहे.

होऊन गेलेल्या तीन सामन्यात मुंबई इंडियन्सचे फलंदाज फ्लॉप होत असल्याचे दिसून येत आहेत, ज्यामुळे अशा फलंदाजीच्या बळावर मुंबई इडियन्स केवळ 150 रनच्या आवाक्यापर्यंत पोहोचू शकला आहे. असे मत विश्लेषक, खेळाडू संजय मांडरेकरांनी म्हटलं आहे. (Mumbai Indians batsmen are becoming flops)

IPL 2021 च्या 13 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्लीच्या खेळांडूनी 6 गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने दिल्लीसमोर 138 धावांचे लक्ष होते, जे दिल्ली ने 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले. मुंबईने याआधी केकेआर आणि एसआरएचसोबत 150 धावांची खेळी केली होती, मात्र त्या सामन्यांप्रमाणे या सामन्यात मुंबईचे गोलंदाजही काही करू शकले नाहीत. या खेळीबाबत माजी भारतीय क्रिकेट आणि इंडिया टीव्ही विश्लेषक संजय मांजरेकरांनी खेळाडूंना टोला लगावला आहे.

‘इंडिया टीव्ही शो’ या कार्यक्रमात बोलताना संजय मांजरेकर म्हणाले की, “दिल्लीसाठी हा मोठा विजय आहे. मुंबई ही नेहमी सुरुवातीला टॉस जिंकते आणि टॉस जिंकून फक्त 150 धावांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करते, दोनदा टॉस जिंकून त्यांनी हाच स्कोर त्यांनी काढला होता, मात्र दिल्लीविरुद्धच्या सामन्यात असे झाले नाही. कारण दिल्लीच्या संघाने उत्तम प्रदर्शन दाखावले. हा विजय दिल्लीसाठीही चांगला होता, कारण ते प्रथमच चेन्नईत खेळत आहेत.

त्याचवेळी भारतीय संघाचे माजी कर्णधार अंजुम चोप्रांनी त्याच कार्यक्रमात सांगितले की शेवटच्या क्षणी फलंदाजीसाठी आलेल्या शिमरन हेटमीयरने दिल्ली संघाला जिंकण्याच्या दिशेला घेऊन गेला परंतू कालचा सामना जिंकण्यांचे सर्वस्व हे दिल्लीच्या प्रत्येक खेळाडूला जाते.

दिल्लीच्या विजयाचा नायक कोण?
अंजुमने धवन आणि अमित मिश्रा यांना दिल्लीच्या विजयाचे हिरो म्हटले आहे. ते म्हणाले की, जर मिश्राने प्रथम उत्तम स्पेलिंगसह मुंबईची विकेट घेतली नसती तर सामन्याचा निकाल वेगळा असता. फलंदाजीपेक्षा या पिचवर गोलंदाजी करणे सोपे आहे, हे जर आधी माहिती नसते तर धवनला कदाचित अशा धावा करता आल्या नसत्या.

मुंबई इंडियन्सने फलंदाजीचा क्रम बदलला पाहिजे का?
गेल्या तीन सामन्यात मुंबईचे फलंदाज सतत फ्लॉप होते, ज्यामुळे अशा फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्स हा संघ केवळ 150 च्या आवाक्यापर्यंत पोहोचू शकला आहे. अशा परिस्थितीत मुंबईला त्यांच्या फलंदाजी क्रमात बदल करण्याची गरज आहे काय, असा महत्त्वाचा प्रश्न पडतो.

या प्रश्नावर संजय मांजरेकर म्हणाले, “सूर्यकुमार यादवची कोणत्या वेळेला खेळणार यांची संख्या निश्चित आहे, इशान किशन चौथ्या क्रमांकावर आला, परंतू विकेटही पटकन झाली नाही तर दोघांची पार्टनरशिप तयार होती. हार्दिक पंड्या जो खेळताना लवकर बाहेर पडतो, त्यामुळे मुंबईसाठी ती एक समस्या झाली. परंतू नेहमीप्रमाणे पोलार्ड नेहमीच हिट ठरला आणि क्रुणाल गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे, तरीही फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केल्यास काही फरक पडेल असे वाटत नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments