फेमस

IPL 2021: प्लेइंग इलेव्हनमध्ये मुंबई इंडीयन्सला जास्त बदल करण्याची गरज नाही,पार्थिव पटेल…

पार्थिव पटेल म्हणतोय मुंबई इंडीयन्सची प्लेइंग इलेव्हन खूप मजबूत आहे,त्यांना हरवणे अशक्य...

भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल याचे असे म्हणणे आहे की, गतविजेता(Defending champion) मुंबई इंडियन्सचा हा एक संघ(team)आहे जो कोणत्याही मैदानावर(ground) चांगला खेळ करू शकतो.मुंबईच्या वानखेडे मैदानावर त्यांना खेळता नाही येणार हि समस्या त्यांच्यासमोर मोठी ठरू शकणार नाही.

या आयपीएल(IPL) 2021 मध्ये कोणत्याही संघाला त्यांच्या ‘होम ग्राउंडमध्ये’ खेळण्याचा फायदा मिळणार नाही, त्यामुळे संघांसमोर प्लेइंग इलेव्हन (playing eleven) निवडणे हे एक सर्वात मोठे आव्हान ठरू शकते. मुंबई इंडियन्स चेन्नईत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धची मोहीम सुरू करणार आहेत. कारण मुंबई इंडियन्स विरूद्ध आरसीबी (RCB) 2021आयपीएल (IPL)चा पाहिला सामना 9 एप्रिल ला या दोन संगात खेळला जाणार आहे .

पार्थिव पटेल याचा असा विश्वास आहे की मुंबई इंडियन्सचा संघ खूपच स्थिर झाला आहे आणि तो म्हणाला की, गतविजेत्या चॅम्पियन्सने त्यांच्या प्ले- इलेव्हनमध्ये जास्त छेडछाड करण्याची गरज नाही. तो म्हणाला, “मला वाटत नाही की मुंबई इंडियन्स कोठे खेळायचे याचा विचार करेल. सर्वच संघ प्रथम कोठे खेळत आहेत याचा विचार करत असतील. सर्व संघ आपल्या सर्वोत्तम इलेव्हनसह बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील.”

पार्थिव पटेल याने स्टार स्पोर्ट्सला असे सांगितले आहे की, “जर ते चेन्नईत खेळत असतील तर प्लेइंग इलेव्हनमध्ये आम्ही काही फिरकीपटूंची अपेक्षा करू शकतो,परंतु मुंबई इंडियन्सच्या दृष्टीकोनातून मला असे वाटत नाही की त्यांना त्यांच्या खेळत्या इलेव्हनमध्ये जास्त काही बदल करावे लागतील.” आयपीएल(IPL) 2021 मध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करेल असे त्याला वाटते. हार्दिक पांड्या आता बरीच गोलंदाजी करीत आहे. इंग्लंड विरुध्द भारत च्या सिरीज मध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments