आपलं शहर

Mumbai Local : अनलॉकमध्ये तब्बल 3.43 लाख जणांनी केला बेकायदेशीर लोकल प्रवास, 12.25 करोड दंड जमा

Mumbai Local : अनलॉकमध्ये तब्बल 3.43 लाख जणांनी केला बेकायदेशीर लोकल प्रवास, 12.25 करोड दंड जमा

Mumbai Local : 1 फेब्रुवारीपासून सर्वसाधारण लोकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली होती, सर्वसामान्यांना दिलेल्या वेळेत प्रवास करण्याची परवानगी होती, मात्र अनेकांनी याचा गैरफायदा उठवल्याचे पाहायला मिळत आहे.

सामान्य लोकांना गर्दी नसलेल्या तासांमध्ये प्रवास करण्याची मुभा आहे, तर गर्दीच्या वेळेस त्यांना तिकीट दिले जात नाही, यामुळे अवैध प्रवासाचे प्रकार वाढत आहेत. लांब प्रवास असलेल्या ट्रेनसाठी बनावट आयडी दाखवून तिकीट बुक करायचे प्रकारही वाढल्याचे एका रेल्वे अधीकाऱ्याने म्हटले आहे.

असे गुन्हा रोखण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष पथके तयार केली आहेत. याचा परिणाम म्हणून, 15 जून 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत मध्य रेल्वेने 3.43 लाख प्रवासी पकडले आहे, जे अनियमित प्रवास करतात.गेल्या 9 महिन्यात दंडाच्या रूपात 12.25 करोड रुपये वसूल केले आहेत. त्यापैकी सुमारे 2.48 लाख प्रकरणे मुंबई उपनगरीय गाड्यांमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

अनेक राज्यांतून मुंबईत येणाऱ्यांना कोरोनाचा अहवाल दाखवणे गरजेचे आहे, बाहेरच्या पल्ल्यांना जायचं असेल तर आधी कोरोना रिपोर्ट दाखवणे गरजेचे आहे, मात्र कोरोना रिपोर्ट न दाखवता अनेकजण बेकायदेशीरपणे तिकीट बुक करत असल्याचं समोर आलं आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या कोट्यातून तिकिटे काढून प्रवास करणे, ई-तिकिटांद्वारे छेडछाड करुन त्या मार्फत प्रवास करण्याचा प्रयत्न करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट आयडी कार्डसह प्रवास करणे किंवा कुटूंबाच्या किंवा नातेवाईकाच्या नावावर तिकीट बुक करणे या घटना हळू हळू समोर येऊ लागल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments