आपलं शहर

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल संदर्भात सर्वात मोठी अपडेट, लॉकडाऊननंतर नियमांत बदल…

पुन्हा एकदा लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद होण्याची शक्यता आहे. असे संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

गेल्या वर्षी कोविड-19 मुळे लॉकडाऊन झाल्याने लोकल सेवादेखील बंद करण्यात आली होती. साधारण दहा महिने लोकल सेवा सामान्य जनतेसाठी बंद होती. लोकल सेवा बंद असल्याने अनेक लोकांना स्वतःच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे राज्य सरकारने ट्रेन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबईतील लोकल सेवा 1 फेब्रुवारी 2021 पासून पुन्हा सामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आली होती. राज्यात तसेच मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता आता पुन्हा एकदा लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद होण्याची शक्यता आहे. असे संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिले. (Mumbai local train services likely to shut for general public)

लोकल सेवा सुरू झाल्याने पुन्हा गर्दी दिसू लागली. ज्यामुळे covid-19चे प्रमाण वाढू लागले आहे. त्यासाठी रेल्वे सेवा पूर्णपणे बंद केली जाणार किंवा यावर पूर्वीप्रमाणे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

30 एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असल्याने व्यापारी समुदायाचा याला जोरदार विरोध आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत व्यापारावरील बंधने कमी करावी अशी मागणीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडे व्यापाऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर व्यापारी रस्त्यावरदेखील उतरले होते. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसात काही निर्बंध कमी करण्याचे संकेत दिले असल्याने व्यापाऱ्यांना दोन दिवसात दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments