आपलं शहर

Mumbai Lockdown : 3 दिवसांपासून स्टेशनवर झोपून, भाकरीचा पत्ता नाही, मुंबईत परिस्थिती बिघडली

लोकमान्य टिळक रेल्वे स्टेशनच्या बाहेर युपी बिहारला जाणाऱ्या लोकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी

कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येमुळे राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले. परंतु लॉकडाऊन च्या भीतीने अनेक कामगार त्यांच्या घरी जायला निघाले. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुफान गर्दी पाहायला मिळते. लोकमान्य टिळक टर्मिनसवर दिवसाला हजारो लोक ट्रेनची वाट बघत बसलेले पाहायला मिळतात. परंतु आठ नंतर 144 कलम लागू होतो. त्या वेळेस स्टेशनवर वाट बघणाऱ्या कामगारांनी काय करायचं?

लोकमान्य टिळक रेल्वे स्टेशनच्या बाहेर युपी बिहारला जाणाऱ्या लोकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. ना जायला तिकीट आहे ना खायला जेवण. लोक घरी जायचं या एका आशेवर पूर्ण रात्रभर रेल्वे स्टेशन बाहेर राहतात. लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वेस्टेशनवर धीरज कुमार यांनी सांगितले की लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या गावी बिहारला जायचं आहे. ते टाइल्स मार्बलमध्ये मिस्त्री आहेत. काम करून देखील त्यांना पूर्ण पगार मिळाला नाही. शेठ बोलले की तुम्ही गावी जावा उरलेले पैसे बँक अकाउंट मध्ये टाकू. मागील वर्षी लॉकडाऊन मध्ये देखील आम्ही मुंबईमध्ये दोन महिने अडकलो होतो. तेव्हा ना काम होतं ना पैसा, त्यामुळे पैसे उधार घ्यावे लागले. यावेळेस देखील पैसे उधार घेऊन गावी जात आहे.(Mumbai Lockdown: Lockdown worsened the situation in Mumbai)

रेल्वे स्टेशन वरील पप्पू सहानी या प्रवाशाने सांगितले की ते सहा महिन्या पासून काम करत आहेत. लॉकडाऊन लागल्याने काम देखील बंद झाले. त्यामुळे आता गावी जाऊन शेती करून उदरनिर्वाह करावे लागणार, त्यामुळे ते गावी जात आहेत.

बिहारला जाणारे जगन्नाथ यादव यांनी सांगितले की, तिकीट काउंटर बंद असते आणि रेल्वे स्टेशन वर देखील जाऊ देत नाही. लॉकडाऊनमुळे आम्ही प्रत्येक वेळेस अडकलो जातोय. तिकीट काउंटर बंद असल्याने आमच्याकडे तिकीट देखील नाही आणि पैसे नसल्याने खायला देखील नाही.आता घरचे देखील बोलत आहेत की कोणतीही गाडी पकडा आणि घरी लवकर या. आता गावी राहून शिळी भाकरी खाऊ परंतु परिवाराला सोडून पुन्हा मुंबईला येणार नाही.

काही लोकांनी सांगितले की ते मुंबईमध्ये मजुरी करत होते. परंतु त्यांच्या शेठने सांगितले की यावेळी पैसे नाही मिळणार त्यामुळे काम सोडावे लागले. तर काहींनी सांगितले की चार आठवडे पहिलेच मुंबई मध्ये काम करायला आलो होतो. मागील वर्षी मुंबईत अडकलो होतो. त्यामुळे खायला-प्यायला देखील मिळत नव्हते या वेळेस देखील तीच हालत होऊ नये म्हणून आम्ही इथून लवकर जात आहोत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments