आपलं शहर

1 मेपासून लसीकरण, मात्र किशोरी पेडणेकरांचे महत्त्वाचे सवाल…

लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा केला जाईल का?- किशोरी पेडणेकर

कोरोनाचे संकट पाहता मुंबईमध्ये 1 मेपासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये लसींची खरेदी आणि इतर गोष्टींची तयारी सुरू आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लसींची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावे याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी सांगितले की, लसीकरणासाठी सर्व सेंटरची तयारी केली जात आहे. परंतू लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा केला जाईल का? त्याच बरोबर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राथमिकता द्यावी लागेल.(Mumbai Mayor kishori pednekar expresses concerns over availability of COVID-19 vaccine doses)

किशोरी पेडणेकर यांनी पुढे सांगितले की, “आम्ही त्या लोकांची यादी बनवली आहे जे लोक त्यांच्या खरेदीसाठी मदत करू शकतात. कारण की आपल्याकडे सर्व तयारी केलेली आहे. परंतू लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा झाला नाही तर लसीकरण करता येणार नाही”.

बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन covid-19च्या लसीं चे 1 लाख 58 हजार डोस मिळालेले आहेत. त्यामुळे सरकारी आणि प्रायव्हेट केंद्रावर यांचे वाटप सुरू आहे. covid-19 लसीकरण अभियानांतर्गत सरकारने 59 लसीकरण केंद्र स्थापित केले आहेत. त्याच बरोबर 73 हॉस्पिटलमध्ये एकूण 132 लसीकरण केंद्र सुरू केले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments