खूप काही

Mumbai To Kanpur। तब्बल 1.10 लाख कोरोनाचे डोस कानपूरला रवाना

महाराष्ट्र, देशात आणि परदेशात कोरोना लशींचे वाटप मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

महाराष्ट्र, देशात आणि परदेशात कोरोना लसींचे वाटप मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अनेकठिकाणी कोरोना लस पुरवली जात आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी मुंबईच्या फ्लाइटने कोविशिल्ड लसीचे 1.10 लाख डोस मुंबईहून उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत.

वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंडळाच्या अतिरिक्त संचालकांनी चाकेरी विमानतळावर ही लस मिळवली आहे .

सध्या कानपूरच्या विभागीय कोल्ड चैन सेंटरमध्ये लस साठवण्यात आली आहे, यापैकी 90 हजार डोस वितरित करण्यात आले आहेत, तर 20 हजार डोस सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

एडी हेल्थ डॉ. जीके मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून मुंबईमार्गे 1.10 लाख डोस कानपूरला पाठवण्यात आले आहेत.

सरकारच्या सूचनेनुसार उत्तरप्रदेशातील सर्व जिल्ह्यात लसीचे वितरण करण्यात आले आहे. कानपूर शहराला लसीचे जास्तीत जास्त 30 हजार डोस आणि कन्नौज जिल्ह्याला किमान 10 हजार डोस देण्यात आले आहेत, याचबरोबर फर्रुखाबादला 15 हजार तर इटावा आणि औरैया जिल्ह्यात 12हजार लसींचा पुरवठा करण्यात आलेला आहे.

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये बनलेले कोरोनाचे लाखो डोस देशासह परदेशात पाठवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी हवाई मार्गाने तर काही ठिकाणी रस्ते मार्गाने लस पोहचवण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाकडून देण्यात येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments