आपलं शहर

महापालिका अशा पध्दतीने करणार छोट्यातल्या छोट्या हॉस्पिटलला ऑक्सिजनची मदत…

देशात बर्‍याच ठिकाणी कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता असल्याची माहिती आपणास समोर येत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मुंबईतील ही कमतरता दूर करण्यासाठी पालिका प्रयत्न करताना दिसून येते.

देशात बर्‍याच ठिकाणी कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत BMC ने मुंबईतील वाढत्या कोरोनावर मात करण्यासाठी महापालिका ने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आता खासगी नर्सिंग होममध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत . BMC आता केवळ सरकारी रुग्णालयेच नव्हे, तर छोट्या खाजगी नर्सिंग होममध्ये ऑक्सिजन पुरवठ्याचीही काळजी घेणार आहे.

प्रत्येक वॉर्डामध्ये असलेले अधिकारी काळजी घेतील की एखाद्या लहान रुग्णालयात किंवा नर्सिंग होममध्ये ऑक्सिजनची कमतरता भासून आल्यास जवळच्या मोठ्या रुग्णालयातून लहान रुग्णालायांना पुरवठा करण्याची व्यवस्था केली पाहिजे. BMC ने असे आश्वासन दिले आहे की मुंबईला दररोज 235( MT liquid) ऑक्सिजन मिळेल आणि याची कोठेही कमतरता भासणार नाही. त्यासंदर्भात आवश्यक त्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत ऑक्सिजनची कमतरता आणि परिस्थिती टाळण्यासाठी तसेच जीवघेणा धोका न पत्करण्यासाठी BMC ने आता सात झोनमध्ये 500 लिटर ऑक्सिजनचा साठा करून ठेवला आहे.

छोट्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी उप अभियंता (sub Engineeris) असलेले बीएमसीचे नागरी अधिकारी FDA आणि वितरकांशी (distributors) यांच्याशी संपर्क साधतील. यानंतरही रुग्णालयांना मदत न मिळाल्यास मोठ्या रुग्णालयांतून ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात येणार.

खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनच्या दैनंदिन वापराची यादी तयार करण्यास सांगितले आहे. ते ही यादी पालिकेला सादर करतील जेणेकरून साठा व पुरवठा कायम राहील ऑक्सिजनचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाहून त्याचे परिवहन व वितरण यावर BMC चे अधिकारी बारीक लक्ष ठेवतील. खासगी रुग्णालयांना जाणीवपूर्वक ऑक्सिजनचा वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.मुंबईला लवकरच विशाखापट्टणम, जामनगर आणि रायगड येथून 300 MTटन ऑक्सिजन मिळणार आहे. विशाखापट्टणमहून ऑक्सिजनसह येणार्‍या रेल्वेच्या 7 टँकरमुळे शहराला 100 टन ऑक्सिजन मिळणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments