आपलं शहर

नियम मोडलात तर 50 हजार दंड, नवी मुंबई पालिका आक्रमक

नवी मुंबईमध्ये नियमांचे उल्लंघन आता पडणार महाग

नवी मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नवी मुंबईत गुरुवारी 971 नवे कोरोना रुग्ण आढळले, त्यामुळे मुंबईतील महानगरपालिका सतर्क झाली असून प्रशासनाने काही कठोर पाऊले उचलली आहेत.

डिपार्टमेंट स्टोअर्स , मॉल, चित्रपटगृह, हॉल चालकांना यापुढे नियमांचे उल्लंघन महागात पडणार. पहिल्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार असून, दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास सात दिवस ते स्टोअर बंद ठेवण्यात येईल आणि तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास ते दुकान सील करण्यात येईल. वारंवार सूचना देऊन देखील अनेक दुकानदार नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे इथून पुढे नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(new mumbai municipal commissioner strictly action over covid 19 rules)

शिरीष अरदवाड यांच्या नियंत्रणाखाली विशेष पथकही तयार केली आहेत. मनपा आयुक्त अभिजीत बांगर हेही अचानक मॉल्स व इतर ठिकाणी भेट देऊन पाहणी करीत आहेत. कुठेही नियमांचे उल्लंघन करताना दिसल्यास तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत. पालिकेने शहरातील दोन मॉल व अनेक हॉटेल्स कडुन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पन्नास हजाराचा दंड आकारला. हा दंड आकारल्या नंतरही संबंधित ठिकाणी पुन्हा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

रुग्णांचा वाढत आकडा पाहता अधिक कडक निर्बंध लावावे लागतील. परंतु कितीही निर्बंध लावले तरी जोपर्यंत नागरिक ठरवणार नाही तोपर्यंत संख्या नियंत्रणात येणार नाही, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून सर्व नियमांचे पालन करणे हे आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

महापालिकेचे पथक 24 तास गस्त घालत आहे. या पथकामार्फत केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये नियमांचा भंग केल्यामुळे 11 दिवसात 4 हजार 377 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून 25 लाख दंड देखील वसूल करण्यात आला आहे. तरीदेखील वारंवार नियम तोडण्यात येत आहेत. म्हणून दुसऱ्यांदा नियम मोडला तर सात दिवसांसाठी दुकान किंवा मॉल सील करण्यात येणार. तिसऱ्यांदा नियम मोडल्यास कोरोना संपेपर्यंत बंदी घालण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments