आपलं शहर

Mumbai : सील सोसायट्यांनी काय करायचं आणि काही नाही; BMC कडून नियमावली जाहीर…

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बीएमसीने काय करावे व काय करू नये याची यादी जारी केली आहे.

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने कोरोनाबाधित गृहनिर्माण संकुलातील रहिवाशांना कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काय करावे आणि काय करु नये याची यादी जारी केली आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या सर्व रहिवाशांवर बीएमसीने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

1) व्हॉट्सअ‍ॅप किंवा ईमेलद्वारे पॉझिटिव्ह असल्याची घटना कळताच, रहिवाशांनी त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी सोसायटी कार्यालयामध्ये माहिती देणे आवश्यक आहे.

2) कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रूग्णाच्या दारावर एक नोटीस चिकटविली जाईल, ज्यामध्ये कोविड -19 (positive )पॉझिटिव्ह रहिवासी असलेल्या फ्लॅटला सूचित करण्यासाठी क्रॉस एक्स (X) टेपसह क्वारंटाईनची सुरूवातीची आणि शेवटची तारीख दरवाजावर दर्शविली जाईल. हा कालावधी संपेपर्यंत रहिवाशांनी हे नियम पाळने आवश्यक आहे.

3) कोविड-19 प्रभावित फ्लॅटमधील कोणत्याही रहिवाश्याचा अहवाल नकारात्मक आला असला तरी, प्रत्येक मजल्यावरील लँडिंग क्षेत्र, लिफ्ट, स्टिल्ट किंवा पायऱ्या सारख्या सामान्य क्षेत्राचा वापर करण्यास त्याला परवानगी नाही.

4) कोरोना पॉझिटिव्ह (Positive) रूग्णांना वेगळे ठेवण्यासाठी, सोसायटीतील फ्लॅटमधून हलविण्याची परवानगी दिली जाणार नाही कारण यामुळे अनेक घरांमध्ये धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

5) पॉझिटिव्ह अहलापूर्वी या फ्लॅटमध्ये काम करणार्‍या कामगारांना 7 दिवसांच्या कालावधीसाठी quarantine राहावे लागणार आणि ती / तो इतर घरांमध्येही काम करू शकणार नाहीत. गेटवर नकारात्मक कोविड (आरटी-पीसीआर) चाचणी तयार केल्यानंतर त्याला / तिला काम करण्याची परवानगी दिली जाईल.

6) फ्लॅटमध्ये फक्त लॅब तंत्रज्ञ / बीएमसी अधिकाऱ्यांना परवानगी असेल.

8) सुरक्षेची माहिती देणे आवश्यक आहे जेणेकरून मजला स्वच्छ (sanitised) केला जाऊ शकेल.

9) फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे असेल, तरच त्यांना घरातून सोडण्याची परवानगी दिली जाईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments