आपलं शहर

Sachin Vaze Case : सचिन वाझेसोबत दिसणाऱ्या ‘मिस्ट्री वूमन’ला NIA ने घेतलं ताब्यात…

सचिन वाझे यांच्यासोबत दिसणाऱ्या त्या 'महिलेच्या फ्लॅटवर छापा टाकुन एनआयएने तिला ताब्यात घेतले.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या बॉम्ब प्रकरणात एनआयएकडून रोज नववनी खुलासे होत आहेत. एनआयए आता हे प्रकरण सोडवण्याच्या पूर्णपणे जवळ असल्याचे दिसून येत आहे. अंबानीच्या घरी मनसुख हिरेनच्या स्कॉर्पिओ चोरीच्या दिवशी सचिन वाझेबरोबर मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसलेल्या महिलेलाही एजन्सीने ताब्यात घेतले आहे.

16 ते 20 फेब्रुवारी रोजी दक्षिण मुंबईतील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये सचिन वाझे एका महिलेसोबत आढळले होते. एनआयएने या महिलेच्या फ्लॅटवर छापा टाकला असून गुरुवारपासून तिची चौकशी सुरू केली आहे. सध्या एजन्सीने तिचे नाव जाहीर केले नाही. तथापि, अशी बातमी आहे की ही महिला आपल्या काळ्या पैशाचे पांढरे करण्यासाठी सचिन वाझेंसोबत राहात होती.

एनआयएच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे की सचिन वाझेला मदत करणार्‍या या महिलेची दोन आयडी होत्या आणि तिच्याकडे नोटांची मोजणी करणारी मशीनही होती, जी एनआयएने गेल्या महिन्यात वाझेंच्या कारमधून जप्त केली होती. सुत्रांच्या माहितीनुसार एनआयएने गुरुवारी बाबुलनाथ येथील क्लब-हॉटेलवर छापा टाकला आणि वाझेंनी वापरलेली आठ सिमकार्ड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.

ज्या दिवशी मनसुख हिरेनची स्कॉर्पिओ बेपत्ता झाली होती, त्या दिवशी सचिन वाझेंनी मुंबईतील या पॉश हॉटेलमध्ये चेक इन केले होते. त्यावेळेला वाझेंनी बनावट आधार कार्डचा वापर केल्याचीही माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान एनआयएला समजले की या काळात एक महिला त्यांच्याबरोबर या हॉटेलमध्येही होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments