आपलं शहर

दिलासादायक! मुंबईत 1000 ऑक्सिजन, 100 आयसीयू, 100 व्हेंटिलेटर बेड्स वाढणार…

केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे मुंबईत जम्बो कोविड सेंटर उभारणार

संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संकट ओढवले आहे. ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे हाल सुरू आहेत. ऑक्सिजन नसल्याने काही रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेड्स आणि रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागतेय. त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांबरोबरच अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आठवडाभरात 100 आयसीयू आणि 100 व्हेंटिलेटर बेड्स वाढवण्यात येणार आहेत.

मुंबईत ऑक्सिजन बेड्सची मागणीही वाढली आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने बेड वाढवावेत अशी मागणी केली जात होती. केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे मुंबई जम्बो कोविड सेंटर उभारणार आहे. या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हजार ऑक्सिजन बेड्स येथे उपलब्ध होऊन कोरोना रुग्णांवर उपचार होऊ शकतो. भायखळा येथील रिचर्डस्न अॅण्ड क्रुडास जम्बो कोविड सेंटरमध्ये एक हजार ऑक्सिजन बेड सुरू करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.(One thousand oxygen beds in Mumbai; 100 ICU, 100 ventilator will increase)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीच्या दिवसांत कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र यामुळे फुप्फुसात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने शरिराला ऑक्सिजनचा पुरवठा होण्यात अडथळे येतात. त्यामुळे प्रकृती अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. सद्यस्थितीत मुंबईत 1427 अत्यवस्थ रुग्ण आहेत.

पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले की, मुंबईत फक्त 51 आयसीयू आणि 19 व्हेंटिलेटर रिक्त आहेत. पालिकेकडे एकूण 11,124 ऑक्सिजन बेड्स आहेत. यातील 10,028 बेड्सवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1096 बेड रिक्त आहेत. जम्बो सेंटर आणि विविध रुग्णालयांत 2849 आयसीयू बेड्स आहेत. यामधील 2798 बेड्सवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर केवळ 51 बेड रिक्त आहेत. मुंबईतील एकूण 1451 व्हेंटिलेटर बेड्सपैकी 1432 बेड्सवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर केवळ 19 बेड्स रिक्त आहेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments