आपलं शहरखूप काही

oxygen crisis : पाया पडा, उधारी आणा, पण ऑक्सिजन आणा, केंद्र सरकारला आदेश

सामान्य जनता राज्यावर निर्भर आहे आणि त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणं ही सरकारची जबाबदारी आहे.

सध्या हॉस्पिटलमध्ये बेड आणि महत्त्वपूर्ण औषध यांची गरज निर्माण झाली आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला चांगलेच सुनावले आहे. बुधवारी कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं की, देशात कोरोनाची दुसरी लाट चालू आहे. जी सर्वांसाठी खूपच घातक आहे. भारतात सध्या 51 लाख ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

ऑक्सिजनची कमी निर्माण झाली. हे सर्वांसाठी खूप घातक आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमी निर्माण झाल्याने दिल्ली हायकोर्टाने सांगितलं की, “केंद्र सरकार चे काम आहे की, हॉस्पिटल्समध्ये योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा केला जावा.” याच बरोबर कंपनींना देखील हाय कोर्टने सुनवले आहे. व त्यांना असे विचारले गेले की, लालचीपणा इतका वाढला आहे का की, माणुसकीच संपली?(oxygen crisis: borrow, but bring oxygen, orders the central government)

दिल्ली हायकोर्ट ने केंद्र सरकारला सांगितले की, ऑक्सिजनची कमी निर्माण झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव जात आहेत. सामान्य जनता राज्यावर निर्भर आहे आणि त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही कंपन्यापुढे हात जोडा, उधार घ्या किंवा चोरी करा परंतु ऑक्सिजनची कमी भरून काढा. आपण रुग्णांना मरताना पाहू शकत नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि ती सरकारने पार पाडली पाहिजे.

ऑक्सीजन नसल्याने सलग मृतांची संख्या वाढत आहे. आणि सरकारला याचे काहीच वाटत नाही. सरकारला लोकांच्या जिवापेक्षा दुसऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचा अर्थ असा होतो की, आपात्कालीन परिस्थितीत देखील सरकारला लोकांच्या जीवाची पर्वा नाही. कोर्टाने असे सांगितले की, ऑक्सिजनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याची कमी भरून काढणे केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे रक्षण केले जावे. काहीही करून केंद्र सरकारने लोकांचा जीव वाचवला पाहिजे.

कोर्टने असे देखील सांगितले की, टाटा कंपनी स्टील प्लांट पासून बनवलेले ऑक्सिजन डायव्हर्ट करू शकते, तर दुसऱ्या कंपन्या असं का करू शकत नाहीत? यांच्यात माणुसकी अजिबातच नाही का? पेट्रोलियम उद्योग यांच्याकडून देखील ऑक्सिजन घेऊन त्याचा वापर लोकांचा जीव वाचवण्यासाठी करावा.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. सरकारला हजारो लोकांना मरताना बघायचा आहे का? त्यामुळे सरकारने ऑक्सीजनचा योग्य पुरवठा केलाच पाहिजे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments