खूप काही

80 करोड देशवसियांना मिळणार मोफत धान्य, पंतप्रधानांची मोठी घोषणा

देशातील 80 करोड लोकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय..

कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील ८० कोरोड लोकांना मोफत अन्नधान्य वाटप केले जाणार असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमुळे मे आणि जून महिन्यात गरजूंना ५ किलो धान्य मोफत मिळणार. या कामासाठी भारत सरकार एकूण २६ हजार करोड रुपयांचा खर्च करणार आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गातून वाचण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी नरेंद्र मोदींनी ही योजना सुरु केली होती. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांची काम बंद असल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ न यावी यासाठी केंद्र सरकारने ह्या योजनेची सुरुवात केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने योजनेअंतर्गत मोफत अन्नधान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.(PM Modi says 80 crore poor people will get free ration till November)

भारतात दररोज कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्रात लॉकडाउन करण्यात आले.आर्थिक परिस्थितिवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. अनेक लोक महाराष्ट्रातून आपापल्या गावी जाऊ लागले. कोरोनामुळे उत्त्पन्न झालेल्या परिस्थितीत कोणालाही अन्नासाठी रडावं लागू नये या उद्देशाने या योजनेची घोषणा केली.

आज २४ तासात ३ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहार. भारतात एकूण रुग्णांची संख्या जवळपास १ करोड ६३ लाख खापर्यंत पोहोचली आहे. तर २ हजार २६३ लोकांचा मृत्यू झ्हाला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments