कारण

भल्या ट्रोलिंगनंतर पंतप्रधान मोदींनी ती चूक टाळली, फोटो व्हायरल…

मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात कोव्हॅक्सिनची लस घेतली होती.

मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात कोव्हॅक्सिनची लस घेतली होती. त्यावेळेस तोंडावर मास्क नसल्याचे मोदींची फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले होते, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीचा दुसरा डोस घेताना ती चूक टाळली. (Prime Minister Narendra Modi took the second dose of Kovacin)

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. डोस घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता, हे महत्त्वाचं समजल जातं, कारण कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो सेशनमध्ये चेहऱ्यावर मास्क नव्हते.

पहिला डोस घेताना मास्क न वापऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरदार टीकाही करण्यात आली होती, कदाचित याचेच कारण म्हणून कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेताना नरेंद्र मोदी यांनी मास्क परिधान केला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याकडे काही पर्याय आहेत, त्यातील एकमेव पर्याय म्हणजे स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन लस. जर तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल, तर तात्काळ लसीकरण करून घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. (Prime Minister Narendra Modi took the second dose of Kovacin)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments