खूप काही

सोमवारपर्यंत खाजगी लसीकरण केंद्रे बंद, केवळ सरकारी केंद्रे राहतील चालू

10 एप्रिल, 11 एप्रिल आणि 12 एप्रिल हे दिवस खाजगी हॉस्पिटल आणि लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

सध्या देशात अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात देखील लसींची कमी निर्माण झाली आहे. बीएमसीने असे वक्तव्य केले आहे की देशातील लसींच्या कमीमुळे लसीकरण केंद्र सोमवार पर्यंत बंद राहतील. परंतु सरकारी लसीकरण केंद्र चालू राहणार आहेत.

10 एप्रिल, 11 एप्रिल आणि 12 एप्रिल हे दिवस खाजगी हॉस्पिटल आणि लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत. शिवाय नगर आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले की कोविशील्डच्या 99 हजार लसी शुक्रवारी रात्री मुंबईला पोहोचतील. त्या लसी शनिवारी सकाळी नगरपालिका आणि लसीकरण केंद्रावर दिल्या जातील.(private vaccination centers closed till Monday, only government centers will remain open)

शनिवारी लसीकरणासाठी वेळेची विभागणी करून दिली जाईल. के इ एम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, राजवाडी हॉस्पिटल, माहीम हॉस्पिटल, बीकेसी जम्बो कोविड केंद्र या हॉस्पिटलमध्ये लसीकरण केले जाईल. दुसरे सत्र संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असेल. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत लसीकरण चालू असेल.

बीएमसी कडून अशी माहिती मिळाली की मुंबईमध्ये 71 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्राद्वारे दिवसाला 40 ते 50 हजार पर्यंत लसीकरण केले जाते. महाराष्ट्र मध्ये शुक्रवारी 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या 58,993 पर्यंत पोहोचली असून 301 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लसीकरण करणे अतिशय महत्वाचे आहे. अशातच लसींची कमी निर्माण झाली आहे त्यामुळे तीन दिवस खाजगी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार. परंतु सरकारी हॉस्पिटल आणि लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments