कारण

रश्मी शुक्लांनी केला होता बड्या नेत्यांचा फोन टॅपिंग, आता आले चौकशीचे आदेश

फोन टॅपिंग प्रकरणी तपासाचा वेग वाढला, रश्मी शुक्ला यांना समन्स धाडण्यात आले

मुंबई:फोन टॅपिंग प्रकरणी तपासाला वेग आला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बीकेसी सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या आधारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले आहे. ( Mumbai Police Summons IPS Officer Rashmi Shukla )

भारतीय टेलिग्राफी अॅक्ट कलम 30, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 43 व 46 तसेच ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट(Official Secret act) अन्वये रश्मी शुक्ला यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. बुधवार दि. २८ एप्रिल रोजी त्यांना जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडण्यात आले आहे. रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक आहेत. हैदराबाद येथे त्या कार्यरत आहे. फेब्रुवारीपासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालानंतर राज्य गुप्तचर विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने आता रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

आव्हाड यांनी केला होता आरोप

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी काही व्यक्तींच्या नावे फोन टॅपिंगची परवानगी घेऊन भलत्याच व्यक्तींचे आणि मंत्र्यांचे फोन टॅप केले होते व या फोन टॅपिंगचा अहवाल लीक केला गेला असा खळबळजनक आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या लीक अहवालाचा आधार घेत पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच या प्रकरणी चौकशी व्हावी अशी विनंती काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments