फेमस

IPL 2021 : या खेळाडूमुळे RCB ला दुसरा विजय, ठरला विकेटचा बादशहा…

RCB vs SRH मॅक्सवेलच्या दमदार फलंदाजी आणि अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादचा 6 धावांनी पराभव झाला.

एसआरएच विरुद्ध आरसीबी इंडियन प्रीमियर लीगच्या (ipl) 14 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादला 6 धावांनी पराभूत केले. त्यापूर्वी, हैदराबादने बेंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून केवळ 143 धावा करू शकला.

हैदराबादकडून कर्णधार वॉर्नरने सर्वाधिक धावा बनवल्या. यामध्ये वॉर्नरने 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 धावा फटकवल्या. शिवाय मनीष पांडेने 38 आणि राशिद खानने 17 धावा केल्या. 20 व्या ओव्हरमध्ये हर्षद पटेलने दोन विकेट घेतल्या. तरी शेवटच्या ओवरमध्ये हैदराबादला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती.

शाहबाजने एका ओव्हरमध्ये तीन खेळाडू बाद केले:

17 व्या ओव्हरमधील दुसर्‍या आणि तिसर्‍या चेंडूवर शाहबाजने सलग दोन खेळाडू बाद केले. त्याने पहिल्या बॉलवर जॉनी बेअरस्टो, दुसऱ्या बॉलवर मनीष पांडे आणि शेवटच्या बॉलवर सामदला आऊट केले. जॉनी बेअरस्टो 12 ​​धावा काढून बाद झाला. त्यांच्यानंतर पुढच्या चेंडूवर मनीष पांडे 39 चेंडूंत 38 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर अब्दुल समदही शेवटच्या बॉलवर आऊट झाला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ची प्लेइंग इलेव्हन:

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिककल, शाहबाज अहमद, एबी डिव्हिलियर्स (विकेटकिपर), ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिश्चन,वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल,काईल जेम्सन,मोहम्मद सिराज,युजवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबादची (SRH) प्लेइंग इलेव्हन:

डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन),रिद्धिमान साहा,मनीष पांडे,जॉनी बेअरस्टो,विजय शंकर,जेसन धारक,अब्दुल समद,रशीद खान,भुवनेश्वर कुमार,शाहबाज नदीम,टी. नटराजन.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments