Mumbai Lockdown : मुंबईत उद्यापासून निर्बंध लागणार, महापौरांची मोठी घोषणा…
Mumbai Lockdown : मुंबई दुसऱ्या लॉकडाऊनच्या वाटेवर, नव्या निर्बंधांची शक्यता...

कोरोनाचे सावट मुंबईमध्ये (Mumbai) खूपच जास्त प्रमाणात वाढत चालले आहे .यामुळे अनेक लोक अस्वस्त झाले आहेत. संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला तर सध्या मुंबईमध्ये 3 हजार 900 बेडपैकी 324 आयसीयू (ICU)बेड्स सध्या उपलब्ध असलेल्याचे चित्र आहे.
मुंबईतील रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत व्हेंटिलेटर बेड (Ventilator Beds) हे देखील 170 उपलब्ध आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याप्रमाणे धोकादेखील जास्त प्रमाणात वाढत आहे. मुंबईची परिस्थिती डेंजर झोनमध्ये (danger zone) असल्याचं चित्र सध्या निर्माण होत आहे.
मुंबईमध्ये आलेले कामगार (Laborer) आणि इतर लोकदेखील येथील परिस्थिती सांभाळून घेत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देऊनही चालणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव हा जास्तीत जास्त प्रमाणात मुंबईतील चाळीमध्ये, इमारतीसह गर्दीच्या ठिकाणी वाढत आहे. असे असले तरी झोपडपट्टी भागत तितका कोरोना नसल्याचं चित्र आहे. तरी सध्याच्या परिस्थितीत जेवढे बेड आहेत, त्यापेक्षा अधिक प्रमाणात बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न बीएमसीकडून होत असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
मुंबईत उद्या पासून निर्बंध(Restrictions) लागणार आहेत :
- हॉटेल आणि धार्मिक स्थळांवर निर्बंध (Restrictions) असतील.
- मॉलदेखील बंद होण्याची शक्यता आहे.
- केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना ट्रेनने प्रवास करण्याची मुभा मिळेल.
- 50 टक्के उपस्थितीत कार्यालये सुरु ठेवण्याचा विचार आहे.
- आलीपाळीने दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.