कारण

Sachin Vaze Case : काय घडलं आज संपूर्ण दिवसभरात, सचिन वाझेंसदर्भात महत्त्वाचा निकाल

अंबानीच्या घरासमोर स्फोटके ठेवणे आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात आज घडीला तीन आरोपी एनआयएच्या ताब्यात आहे.

अंबानीच्या घरासमोर स्फोटके ठेवणे आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात आज घडीला तीन आरोपी एनआयएच्या ताब्यात आहे. सचिन वाझे, विनायक शिंदे आणि नरेश गौर या तिघांना आज एनआयए कोर्टात हजर करण्यात आले होते. (What happened today throughout the day, a crucial court decision)

तिघांना कोर्टात हजर केल्यानंतर एमआयएच्या वकिलांनी विनायक शिंदे आणि नरेश गौर या दोघांना न्यायलयीन कोठडीची मागणी केली, त्यामुळे न्यायालयाकडून त्या दोघांना न्यायलयीन कोठडीचे आदेश दिले. दुसरीकडे NIA मार्फत वकील अनिल सिंह यांनी सचिन वाझेंना चौकशीसाठी एनआयए कोठडी देण्याची मागणी केली. एनआयए कोर्टाची मागणी करताना अनेक त्यांनी न्यायलयासमोर हजर केले.

सचिन वाझे जरी एपीआय पातळीचे अधिकारी असले तरी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे सापडले आहेत, है सर्व पैसे आले कुठून? ही सर्व खंडणीची रक्कम आहे का? किंवा कुठून गोळा केले आहेत? याबाबत एनआयएला तपास करायचा आहे. त्याचबरोबर आरोपीकडे मोठ्या प्रमाणावर जिलेटिन कुठून आली? जे पैसे गोळा केलेत, तेच जिलेटिन खरेदीसाठी वापरलेत का, या सगळ्यांच्या चौकशीसाठी एनआयए कोठडीची गरज असल्याचं NIA च्या वकीलांनी कोर्टात मांडलं.

सध्या NIA कडून मनसुख हिरेनला मारण्याचा प्लॅन 2 आणि 3 मार्च रोजी करण्यात आला होता. त्याचबरोबर एॅक्सिस बँक खात्यात कंपनीच्या एकांउन्टमध्ये 1कोटी 51 लाखांपेक्षा जास्त रक्कम सापडली असल्याची माहितीही एनआयएने कोर्टात दिली आहे. दरम्यान कोर्टाने सचिन वाजेला 9 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीचे आदेश सुनावले आहेत. (Sachin Waze case update)

एनआयएच्या एका तपासात एँटीलिया प्रकरणातील रचलेल्या कटामध्ये मनसुख हिरेनसुद्धा सहभागी होत्याचं समोर आलं आहे. जो कट होता त्यात सह आरोपी असल्याची महिती कोर्टात दिली गेली. (What happened today throughout the day, a crucial court decision)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments