खूप काही

Saint Louis: मैत्रिणीशी असलेल्या जवळीकच्या प्रकरणात 32 वर्षीय भारतीय तरुणाची मिसौरीमध्ये हत्या

Saint louis University: अमेरिकेतील मिसौरी (Missouri) भारतीय अभियंत्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी असलेल्या 32 वर्षीय शरीफ रहमान खान याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मैत्रिणीशी असलेली जवळीक खटकल्याने अमेरिकन नागरिकाने शरीफची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणात पोलिसांनी 23 वर्षीय कोल मिलर याला अटक केली आहे.मयत शरीफ रहमान खान याच्या मैत्रिणीशी कोलची जवळीक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शरीफची मैत्रीण राहत असलेल्या युनिवर्सिटी अपार्टमेंटमध्ये कोल गेल्या बुधवारी गेला होता. त्यावेळी शरीफही तिथेच होता. तेव्हा दोघांमध्ये वादावादी झाली.रागात शरीफने कोलला ठोसा मारला तेव्हा चिडलेल्या कोलने गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप आहे.

गेल्या 6 वर्षांपासून शरीफ सेंट लुईसमध्ये नोकरी निम्मित स्थायित आहे.दरवर्षी ईदला तो सुट्टी घेऊन परत यायचा मात्र त्याच्या मृत्यूमुळे खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीफ रेहमान खान यायंच्यावर अमेरिकेतच अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments