कारण

राठोड, देशमुखांनंतर शिवसेनेच्या परबांचा नंबर, भाजपकडून काऊंट डाऊनला सुरुवात…

वनमंत्री संजय राठोड, गृहमंत्री अनिल देशमुखांनंतर अनिल परबांचा नंबर; भाजपच्या बड्या नेत्याने वर्तवले संकेत

वनमंत्री संजय राठोड, (Forest Minister Sanjay Rathod) गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यानंतर शिवसेनेच्या अनिल परबांचा (Anil Parab) नंबर लागणार असे संकेत भाजपच्या बड्या नेत्याने वर्तवल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

100 कोटींच्या खंडणीप्रकरणात चर्चेत असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Home Minister Anil Deshmukh) राजीनामा दिल्यानंतर राजकीय वादळ तापण्यास सुरुवात झाली आहे. या सगळ्यात भाजप नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader Kirit Somaiya) मोठं विधान केल्याने पुन्हा एकदा त्यात ठिणगी पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले आणि आता शिवसेनेच्या अनिल परबांचा नंबर (Shiv Sena leader Anil Parab) असं स्फोटक विधान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केल्याने खळबळ माजली आहे. अनिल परब यांच्या बाबतीत नेमके कोणते गुन्हे समोर येणार, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. (Shiv Sena leader Anil Parab’s number after Sanjay Rathore and Anil Deshmukh)

100 कोटींच्या खंडणीप्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहानी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायलयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या १५ दिवसात CBI ने चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश उच्च न्यायलयाने केला आहे. मात्र चौकशी होत असताना संविधानिक पदावर राहणे योग्य नाही, अशा विचाराने अनिल देशमुखांनी स्वत:हून राजीनामा दिला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

अनिल देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर अखेर विरोध पक्षाच्या नेत्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे, तर येत्या काळात शिवसेना नेते अनिल परबांचादेखील नंबर लागेल, असं मत सोमय्यांनी व्यक्त केले आहे.

पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्रीतरी घरी जाणार आहेत, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी व्यक्त केली आहे. अनिल देशमुखांनंतर अनिल परबांचा नंबर लागेल, असं मत किरिट सोमय्यांनी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. नेमके कोणते आरोप अनिल परब यांच्यावर केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments