आपलं शहर

Mumbai New Rule : …तर मुंबईतल्या अनेक सोसायट्यांना 10 हजार दंड भरावा लागणार…

कोव्हिडच्या नियमांचं पालण केलं नाही तर मुंबईतल्या सोसायट्यांना 10 हजार दंड भरावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दादरसह मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. अनेक दुकाने बंद करण्याचे आदेश पोलिसांकडून दिले जात असल्याने अनेक ठिकाणि शुकशुकाट पसरल्याचं वातावरण आहे. (Societies pay fines for violating the rules)

फेब्रुवारीपासून मुंबईत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे पालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. अनेकदा सोसायटींकडून पालिकेने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले जात असते, त्यामुळे सोसायट्यांना दंड ठोठवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पहिल्यांदा एखाद्या सोसायटीने दंड ठोठवल्यास तब्बल १० हजार दंड सोयायटीकडून वसूल केला जाईल, तर दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास २० हजार रुपयांचा दंड सोसायटीकडून आकारण्यात येईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईतील झोपडपट्टी भागांसह सोसायट्यांमध्येदेखील कोरोनाचा शिरकाव मोठ्याप्रमाणत होत असल्याची माहिती बीएमसी अधिकाऱ्यांनी दिली आहे. ६ एप्रिलच्या माहितीनुसार शहरात ७३ कन्टेन्मेंट झोन आहेत, तर ७४० इमारती सील केल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे येत्या काळात हा आकडा वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

शहरात सर्वाधिक म्हणजे KW वार्डमधील इमारती सील केल्या आहे. तब्बल १९६ इमारतींना कोरोना रुग्ण सापडल्याने सील केलं आहे, तर D वार्डमध्ये 116 इमारती सील केल्याचं चित्र आहे.

एखाद्या सोसायटीमध्ये ५ पेक्षा अधिकजण कोरोना रुग्ण सापडले, तर ती संपूर्ण इमारत सील केली जाईल, असा पालिकेने नियम केला आहे, त्यामुळे ज्या सोसायटीमध्ये ५ पेक्षा अधिक लोक राहतात त्या सोसायटीला पोलीस कर्मचारी स्वत:हून सील करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं दिसून येत आहे. (Mumbai housing societies will have to pay ₹10,000 if Covid norms are flouted)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments