आपलं शहर

Maharashtra Lockdown : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दहशत, पुण्या-मुंबईतून यूपी-बिहारसाठी स्पेशल ट्रेन रवाना

मुंबई-पुणे ते बिहार-युपी जाण्यासाठी आता स्पेशल ट्रेन सोडल्या जाणार

कोरोना संक्रमित रुग्णांच्या वाढत्या आकड्यामुळे सेंट्रल रेल्वे ने मोठा निर्णय घेतला आहे. बिहार व उत्तर प्रदेश जाण्यासाठी आता स्पेशल ट्रेन सोडल्या जाणार आहेत. या ट्रेन मुंबईपासून पटना, दरभंगा व गोरखपुर त्याचबरोबर पुण्यापासून दानापूरसाठी धावणार आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे अनेक लोक लॉकडाऊनच्या भीतीने त्यांच्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. जे लोक स्वतःच्या गावी परत जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ट्रेनमध्ये गर्दी होऊ नये यासाठी ही स्पेशल ट्रेन सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर एक्सत्रा ट्रेन देखील सोडण्यात येत आहेत.(special trains will run from Mumbai-Pune to Bihar U-P)

वाढत्या कोरोनामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नवीन निर्बंध घालण्यात आल्यामुळे पूर्वीसारखी लोकल सेवा चालू शकत नाही. परंतु 10 एप्रिलपासून 90 ट्रेन सोडल्या जाण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने लोक महाराष्ट्रातून युपी-बिहार ला जाताना दिसतात. त्यामुळे रेल्वेने लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या वाढलेली आहे. जेणेकरून लोक गर्दी करणार नाही आणि लोकांना त्रास होणार नाही.

स्पेशल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी कन्फर्म तिकीट असणे गरजेचे आहे. तिकीट नसेल तर ते प्रवास करू शकणार नाहीत. प्रवास करताना करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गाईडलाईन दिल्या आहेत आणि नियम बनवले आहेत. त्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments