फेमस

IPL 2021 : फक्त रोहित नाही, तर ‘हे’ तगडे खेळाडूदेखील आहेत मुंबई इंडियन्समध्ये…

येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलचे धडाकेबाज सामने सुरु होणार आहेत. सगळ्या देशवासींना घरी बसून या सगळ्या IPL चा आंनंद घ्यायचा आहे,

येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलचे धडाकेबाज सामने सुरु होणार आहेत. सगळ्या देशवासींना घरी बसून या सगळ्या IPL चा आंनंद घ्यायचा आहे, मात्र या सगळ्यांच्या आधी तुम्हाला IPL मध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या टीमबद्द जाणून घेणं खूप गरजेचं आहे. (The entire team of Mumbai Indians, including Rohit Sharma, the names of many veteran player)

13 पैकी तब्बल 6 वेळा मुंबई इंडियन्सने आयएपीएल कप (IPL CUP) आपल्या नावावर केला आहे, त्यामुळे आयपीएलमधील सगळ्यात यशस्वी टीम म्हणून मुंबईकडे बघितलं जात आहे. संपूर्ण जगाचं लक्ष नेहमीच मुंबईच्या संघावर असतं. मुंबई इंडियन्स नेहमी त्यांच्या कामगिरीमुळे प्रसिद्ध आणि चर्चेत असते, असेच मुंबईच्या चर्चेच्या खेळाडूंबाबत आपण आज बोलणार आहोत.

रोहित शर्माला क्रिकेटच्या जगतातला आक्रमक ओपनर फलंदाज म्हणून ओळखला जातो. तशी कामगिरीही त्याची दमदार आहे. पॉवर प्लेमध्ये धावांचा पाऊस पाडणारा फलंदाज म्हणूनही त्याची अनोखी ओळख आहे.

भारताचा उगवता सुर्य ईशान किशनच्या बॅटिंगकडेही सर्वांच्या नजरा लागून आहेत. इंग्लंडविरुद्ध जलवा दाखवल्यानंतर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससोबत मस्त कामगिरी करण्यासाठी तो तयार झाला आहे. 2020 मुंबईकडून सर्वात जास्त धावा काढणार किशन हा एकमेव खेळाडू आहे.

दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर आणि मुंबई इडियन्सचा फलंदाज क्विंटन डिकॉकनेही मुंबईसाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे, यावेळेसही त्याचा परफॉर्मन्स सर्वोत्कृष्ट असेल, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

कायरन पोलार्डच्या विस्फोटक फलंदाजीबद्दल तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. सामना पलटवून टाकण्याची ताकद पोलार्डमध्ये असते, हे नक्की.

आता नंबर लागतो जगातील सर्वात मोठ्या बीग हिटरचा. तो म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्यावर नेहमी अनेक संघाची नजर असते, मात्र मुंबई इंडियन्ससाठी तो हिरा समजला जातो.

भारतासह अनेक देशांच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवणारा गोलंदाज म्हणजे ट्रेंट बोल्ट. घातक गोलंगाजीने प्रतिस्पर्धी संघाचं कंबरडं मोडण्यासाठी बोल्ट नेहमी तयार असतो.

आणि तुमच्या सगळ्यांचा लाडका जसप्रित बुमराह याने तर अनेक क्रिकेट प्रेमींना आपल्या गोलंदाजीच्या प्रेमात पाडलं आहे. अशा तगड्या टीमसोबत रोहित शर्मा आयपीएलच्या 14 व्या हंगामात विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे, हे नक्की.  (The entire team of Mumbai Indians)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments