आपलं शहर

Mumbai Local : वाढत्या प्रकरनामुळे महिनाभरात घटली लोकल प्रवाशांची संख्या…

अनेक कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरु असल्याने लोकल ट्रेनमधील गर्दीत घट झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याचे दिसून येत आहे, त्यानुसार महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मुबईतील निर्बंधामुळे खासगी कार्यालयातील असणारी मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकल ट्रेनमधील गर्दीतही कमी झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोना व्हायरसचा (corona viruse)प्रसार रोखण्यासाठी मुंबईत मिनी लॉकडाऊन लावला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश लागू केले आहेत. अगदी खासगी कार्यलयांना ही होम मोडमधून काम करण्यास सांगितले आहे.

राज्यात कोरोनाचा (Corona)संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे सरकारने राज्यात कडकडीत निर्बधू लागू केले आहेत, परंतू मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकले ट्रेन (local train)कोरोना संसर्गाचा महत्त्वाचा बिंदू ठरत आहे. परंतू त्यावरच अतिरिक्त निर्बध नाहीत, सरकारने लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी ठरावीक वेळ दिली आहे.

फ्रेबुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्य लोकांना प्रवास करण्याची परवानगी दिल्यामुळे लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, परंतू कडक निर्बंधांमुळे लोकल प्रवाशांची गर्दी कमी झाल्याचे दिसून येत होते. समोर आलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या कमी झाल्याची दिसून येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments