कारण

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यामागची अननोन स्टोरी, असं घडलं अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचे सत्र…

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. (The unkown story behind the resignation of the Home Minister)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेळ आला आहे. माजी पोलीस आयुक्त परंबीर सिंह यांनी आरोप केल्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवली जात होती. या सगळ्या प्रकरणावर भाजपने आवाज उठवल्याने हे प्रकरण चांगलच तापलं होत.

परमबीर सिंहानी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायलयाने उच्च न्यायलयात जाण्याचा सल्ला सिंहांना दिला होता, त्यामुळे उच्चन्यायलयात परमबीर सिंहासह अॅड. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केल्यानंतर त्यावर उच्च न्यायलयाने निकाल दिला आहे.

१०० कोटी खंडणी प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाने cbi कडे दिल्याने चौकशी होईपर्यंत गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार होता. उच्च न्यायालयात सुणावणी सुरु असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु होती. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते.

उच्च न्यायलयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुखांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शरद पवारांशी चर्चा सुरु झाली. या चर्चेत अखेर राजीनामा देण्याचं अनिल देशमुख यांनी मान्य केलं. शरद पवारांकडे देण्याची इच्छा अनिल देशमुखांनी व्यक्त केल्यानंतर शरद पवारांनीही या गोष्टीस होकार दिला. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

राजीनाम्यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. सीबीआयची चौकशी सुरु असताना पदावर राहणे योग्य ठरणार नाही, म्हणून अनिल देशमुख स्वत:हून हा राजीनामा देत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रिपदाचा संपूर्ण कारभार मुख्यमंत्र्यांकडे गेला आहे. (Maharashtra Home Minister Anil Deshmukh resigns)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments