आपलं शहर

रस्त्यातच प्रसुतीकळा, पोलिसांच्या गाडीत झाली महिलेची डिलेव्हरी…

मुंबईच्या वरळी नाका भागात अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे मुंबई पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे.

मुंबईच्या वरळी नाका भागात अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे मुंबई पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे. 13 एप्रिलरोजी सांयंकाळी 5 वाजता वरळी नाका परिसरातून एक गरोदर महिला रस्त्याने चालत होती. तिला अचानक चक्कर आल्याने ती रस्त्यावर कोसळली. (The woman was delivered in a police vehicle)

संबंधित घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चक्कर येऊन पडलेली महिला गरोदर असल्याचे समजताच पोलिसांनी नायर रुग्णालयात महिलेला घेऊन जाण्याचा नर्णय घेतला. रुग्णालयात घेऊन जात असतानाच प्रसुतीकळा वाढल्या, आणि पोलिसांच्या व्हॅनमध्येच महिलेची डिलेव्हरी झाली.

रस्त्याने जात असलेल्या महिलेसोबत तिचे कोणीही कुटुंबिय नव्हते. पोलिसांकडे अॅम्ब्युन्स बोलण्याइतकाही वेळ नसल्याने त्यांनी आपल्याच व्हॅनमधून महिलेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील नायर रुग्णालयाकडे घेऊन जात असताना रस्त्यातच महिलेची डिलिव्हरी झाली.

गाडीमध्ये उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी महिलेची यशस्वीरित्या डिलीव्हरी केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप असल्याची माहिती आहे. प्रसुतीकळांमुळे वेळेपुर्वीच डिलिव्हिरी झाल्याने बाळाला काही काळासाठी दक्षता विभागात दाखळ केले आहे, तर आईची प्रकृती स्थिर आहे.

पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार सपकाळ, वळवी, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, लोहार यांच्या सतर्कतेमुळे आज एका बाळ आणि बाळाच्या आईचे प्राण वाचले, त्यामुळे या योद्ध्यांचे सगळीकडे कौतूक केले जात आहे. (The woman was delivered in a police vehicle)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments