आपलं शहर

भर लॉकडाऊनमध्येही Metro चं काम सुरु, कसं केलय नियोजन

कोरोनाच्या संक्रमणापासून कामगारांना वाचविण्यासाठी योग्य ती सोय तसेच नियमांचे पालन योग्य त्या रितीने सुरु आहे.

पहिल्या लाटेने मुंबईकरांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. आता कुठे सगळे पूर्ववत होण्याच्या वाटेला होते, तेवढ्यात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने मुंबईचा वेग कमी केला आहे.

काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतू शहरातील वाहतुकीची व्यवस्था वेगवान करण्यासाठी मेट्रोचे 90 हजाराहून अधिक कामगार मेट्रोचे काम करत आहेत. हे मजूर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकर (MMRDA) चे आहेत, ते कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्येही मेट्रो मार्गाचे आणि पुलांच्या बांधकाम करत आहेत.

अशा परिस्थितीत प्राधिकरणाने आपल्या कामगारांना कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी कित्येक पावले उचलली आहेत.

एमएमआरडीएच्या (MMRDA) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रोसह अन्य प्रकल्पांवर सध्या सुमारे 9 ते 10 हजार कामगार काम करत आहेत. त्यामुळे मजुरांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना दररोज मल्टी-व्हिटॅमिन गोळ्या तसेच होमिओपॅथीची औषधे दिली जात आहेत.

हे दिल्यामुळे कोरोनाचा धोका त्यांच्यापासून टळेल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, सरकारने दिलेल्या कडक नियमांचे कामाच्या ठिकाणी काटेकोरपणे पालण केले जात आहे. मास्क, सॅनिटायझरसह प्रत्येक ठिकाणी ठराविक संख्येने कामगार काम करत आहेत, जेणेकरून त्यांच्यात सोशल डिस्टन्स असू शकेल. कोरोनापासून बचाव करण्याशिवाय, मजुरांच्या इतर गरजांचीही काळजी घेतली गेली आहे. मजुरांना साबण, तेल, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत.

मजुरांची नियमित तपासणी केली जाते

कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी प्रत्येक कामगारांची रोज तपासणी केली जाते. एमएमआरडीए आयुक्तांनी सर्व कंत्राटदारांना कामगारांच्या सर्व सोयी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे एमएमआरडीए कामगार मोठ्या संख्येने पळून गेल्याच्या घटना झाल्या होत्या, त्याचे परिणामी दिसून आले होते, त्यामुळे त्याचा परिणाम प्रकल्पांवर झाला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे सर्व कामगार कोरोनाच्या परिस्थितीमध्येही काम करत आहेत.

बारा प्रकल्पांवर काम चालू

एमएमआरडीएच्या (MMRD) विभागात मेट्रोचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. साधारण चार ते पाच हजार मजूर विविध मेट्रो प्रकल्पात काम करत असल्याचे दिसून येत आहेत. तसेच हजारो कामगार एमटीएचएलसह अन्य प्रकल्पांमध्ये काम करत आहेत. (The work of Mumbai Metro has started even in the lockdown, that is the planning)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments