आपलं शहर

Mumbai Remdesiveer : कोरोनाच्या इंजेक्शनची चोरी, मुंबईत दुष्काळात तेरावा महिना…

महाराष्ट्रात इंजेक्शनचा तुटवडा, तर इंजेक्शनच्या काळाबाजाराची घटना समोर.

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात सक्रिय असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात रेमडेसिवीरची कमतरताही भासू लागल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचं वातावरण पसरले आहे. याचाच फायदा घेऊन रेमडिसिवीर या औषधाचा काळाबाजार करण्याचे सत्र सुरु आहे.
त्याचदरम्यान मुंबई क्राइम ब्राचने केलेल्या एका छापेमारीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर अंधेरीतील जी आर फार्मा नावाच्या एका शॉपमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात साठा ठेवण्यात आल्याचे मुंबई गुन्हे शाखेने उघड केले आहे.

या कारवाईत आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर कुणी या काळाबाजाराशी संबंधित आहे का, याचा तपास केला जात आहे.

महाराष्ट्रात इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे, त्याचदरम्यान या परिस्थितीचा फायदा घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजाराच्या घटना समोर आहेत, या संकटाच्या काळात काहीजण या इंजेक्शनचा चढ्या दराने विक्री करून स्वत:चा फायदा करून घेत आहेत.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तसेच यावेळी एक कोटीची परवानगी घेऊन जप्त करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा त्वरित रुग्णालयांना देण्यात येणार आहे, त्यामुळे गरजूंना त्यांची संपूर्णपणे फायदा करण्यात येईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments