आपलं शहर

Sea link toll : वरळी-वांद्रे सिलिंकवरील टोलच्या रक्कमेत वाढ…

वरळी-वांद्रे सिलिंकवरील टोलच्या रक्कमेत 18 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.

गुरुवारपासून मुंबईच्या वांद्रे ते वरळी या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या मार्गावरील टोलच्या रक्कमेत पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढ झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितले आहे. 1 एप्रिलपासून सी-लिंकवरील (Bandra Worli sea- link) टोल वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नियमानुसार टोल (toll) हा प्रत्येक म्हणजे दर तीन वर्षानंतर वाढवला जातो.

चारचाकी वाहने आणि लहान वाहनांसाठी 18 टक्क्यांनी वाढ करून 85 रुपये तर मिनी बसेससारख्या वाहनांसाठी 130 रुपये टोल वाढवण्यात आला आहे. तरी बस आणि ट्रक यांसारख्या वाहनांसाठी 175 रुपये दर करण्यात आलेला आहे. टोलमध्ये लहान वाहनांसाठी 15 रुपये तर मध्यम वाहनांसाठी 20 रुपये कर वाढवण्यात आला आहे आणि अवजड वाहनांसाठी 30 रुपये इतका दर वाढवण्यात आला आहे.

वाहनांच्या टोलवरील दरांप्रमाणेच मासिक पासमध्येही वाढ झाली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments