आपलं शहर

मोठी बातमी : घरकाम करणाऱ्यांसाठी नियम बदलले…

घरकाम करणाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केलेले आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्याचबरोबर मुंबईत देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक नियम व आटी लागू केल्या आहेत. यात अनावश्यक बाहेर फिरणे बंद, हॉटेल, बार पूर्वीप्रमाणे बंद, अत्यावश्यक सेवा सोडून अनेक गोष्टी बंद ठेवण्यात आले आहे.रुग्णालय, लस उत्पादक, मास्क जंतुनाशक उत्पादक, कृषी जनावरे संबंधित दुकाने, रेल्वे, ऑटो, बँक, सेबी, दूरसंचार सेवा, पत्रकार, दूरसंचार सेवा, शीतगृह सुरू राहणार.(Travel permits for those who help with household chores)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चैन’ हे नवीन अभियान चालू केले आहे. आय एस चाहूल यांनी सांगितले की, घराकाम करणार्यांना परवानगी दिली आहे.त्यांना निर्बंधातून वगळले जाईल.

कोरोनाच्या संसर्गामुळे १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून ते १ मे पर्यंत अनेक निर्बंध लागू केले आहेत.या काळात पूर्ण संचारबंदी राहील. त्यामुळे जे जे लोक घर काम करतात त्यांना प्रवास करण्याची मुभा दिली जाईल. अशी माहिती बी एम सीचे आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments