खूप काही

मुंबईच्या कलाकाराने प्रसिद्ध ब्रँडच्या लोगोमध्ये बसवली अनेक जिल्ह्यांची नाव

एक मुंबईमधील कलाकार आहे ज्याने मुंबईच्या अनेक स्टेशनची नावे प्रसिद्ध ब्रँडच्या लोगो मध्ये बसवलेली आहेत.

जगात असे अनेक ब्रँड आहेत जे त्यांच्या लोगोमुळे वर्षानुवर्ष बाजारात टिकून आहेत. कंपनीला स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी उत्पादनाशी संबंधित विशिष्ट लोगो ची गरज असते. ज्याने लोगो बघताच आपल्याला त्या वस्तूचा ब्रँड समजतो. जे ब्रांड आपल्याला आवडत असतात त्या ब्रँडचे लोगो आपल्या कायम लक्षात राहतात. भले ते नाव लक्षात राहो किंवा न राहो.

जगभरात असे अनेक कलाकार आहेत जे वेगवेगळ्या कल्पना करून कला साकारतात. असाच एक मुंबईमधील कलाकार आहे ज्याने मुंबईच्या अनेक स्टेशनची नावे प्रसिद्ध ब्रँडच्या लोगो मध्ये बसवलेली आहेत. याच्या कॅलिग्राफी ची व्हिडीओ, फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबारोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची नावे देखील ब्रँडच्या लोगोमध्ये बसवली आहे.(unique calligraphy of sanket chavhan)

या मुंबईच्या कलाकाराचे नाव आहे संकेत चव्हाण. या कलाकाराने अनेक राज्यांची नावे ॲमेझॉन, युट्युब, किंगफिशर, पार्ले-जी अशा अनेक ब्रँडच्या लोगोमध्ये कोल्हापूर, रायगड, अलिबाग, सोलापूर, मालवण अशा अनेक राज्यांची नावे बसवलेली आहेत. मॅगी, टाटा, डाबर, मिरिंदा, लाइफ बॉय, बिसलेरी, एअरटेल, पॅरॅशूट, कॅडबरी, ॲमेझॉन, सॅमसंग, गुगल आशा अनेक प्रसिद्ध लोगोचा वापर केलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanket Chavan (@artspace_sc)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments