आपलं शहर

Corona Vaccination : 18 वर्षांवरील नागरिकांना लस न मिळण्याची शक्यता…

लसींचा साठा मर्यादित असल्याने 18 वर्षांवरील नागरिकांना लस मिळणार नसल्याची शक्यता.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्वच नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

लसीकरण येत्या 1 मे पासून देण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी 28 एप्रिल पासून ऑनलाईन नोंदणीही सुरू होईल. अशातच मुंबईमधील अठरा वर्षांच्यावरील नागरिकांना लस देण्यात येणार नाही अशी माहिती समोर आली आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यास करोना लसींचा साठा कमी पडू शकतो.(Vaccination update for 18+)

मुंबईत लसीकरण सुरू झाल्यानंतर काही दिवसांनीच लसींचा तुटवडा निर्माण झाला. मुंबईत लसींचा मर्यादित साठा उपलब्ध आहे. त्यामुळे 18 वर्षावरील तरुणांना इतक्यात कोरोना लस देण्यात येणार नाही. असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. त्याच बरोबर ते या बाबतीत राज्य सरकारला देखील पत्र लिहिणार आहे.

राज्यात आधीपासूनच लसींचा तुटवडा आहे. त्यात एक मे पासून अठरा वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यास लसींचा साठा कमी पडू शकतो व लसीकरणासाठी गर्दी देखील वाढू शकते. असे इकबाल सिंह चहल यांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अठरा वर्षावरील सर्व नागरिकांसाठी लस देण्याची घोषणा केली होती. परंतु देशातील चार बिगरभाजप राज्यांनी या निर्णयाशी असहमती दर्शवली आहे. कोरोनाच्या लसींचाचा तुटवडा असल्याने 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याची मोहीम आम्ही सुरू करू शकत नाही. असे या राज्यांनी केंद्र सरकारला कळवले. या चार राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड यांचा समावेश आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments