खूप काही

IPL 2021 : वानखेडे स्टेडियममधील 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. खेळाडूंना देखील कोरोनामुळे नियमांचे पालन करावे लागणार.यावर्षी आयपीएलची पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. परंतु आयपीएल संबंधित एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

9 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सर्व संघांचे ट्रेनिंग कॅम्प सुरू होते. वानखेडे मैदानावर आयपीएल मॅचेस खेळविण्यात येणार आहेत त्या अगोदरची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 25 एप्रिल पर्यंतच्या जवळपास एकूण 10 मॅचेस वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.(Wankhede Stadium 8 Groundmen tested Corona Positive before ipl 2021 Started)

स्पोर्टस्टार ने दिलेल्या वृत्तानुसार 19 जणांची सुरुवातीला चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी सुरुवातीला तीन जणांचे आणि त्यानंतर 1 एप्रिलला उर्वरित पाच ते सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आला आहे.

वानखेडेवरच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ऐनवेळी आता कर्मचारी कुठून आणणार? एपीएसच्या शरद पवार अकॅडमी किंवा कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वानखेडेमध्ये काम करायला लागण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments