आपलं शहर

रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने वाढवली ट्रेनची संख्या..

रेल्वे स्टेशनवर मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने पश्चिम रेल्वेने ट्रेनची संख्या वाढवली

महाराष्ट्र मधील कोरोनाची परिस्थिती बघता मुंबईतून अनेक कामगार त्यांच्या गावी जाऊ लागले आहेत. मागील वर्षी देखील लॉकडाऊनच्या आधी हजाराहून अधिक लोक त्यांच्या गावी निघून गेले. त्यामुळे यावर्षी देखील लॉकडाऊनच्या भीतीमुळे अनेक कामगार त्यांच्या गावी जात आहेत. यामुळे रेल्वे स्टेशनवर जास्तीची गर्दी दिसून येत आहे. पश्चिम रेल्वेने वेटिंग लिस्ट प्रवाशांना स्टेशन वर येण्यास बंदी केली आहे.

अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी शुक्रवारी मुंबई डिव्हिजनच्या सहा स्थानकांनवर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या प्लॅटफॉर्मवरून तिकिटांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. त्याच बरोबर गर्दी कमी होण्यासाठी ट्रेनची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे.(Western Railway has increased the number of trains to reduce congestion at railway stations)

पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक आलोक कंसल यांनी सांगितले की रेल्वे स्टेशनवर वेटिंग लिस्ट प्रवाशांना स्टेशनवर प्रवेश दिला जाणार नाही. केवळ आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच स्टेशनवर सोडले जाणार. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की युपी ला जाणाऱ्या ट्रेनमध्ये अतिरिक्त कोच जोडले जात आहे. जेणेकरून गर्दी कमी होईल आणि वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना देखील कन्फर्म तिकीट मिळेल.

आलोक कंसल यांनी सांगितले की पश्चिम रेल्वेमध्ये 100 पासून 300 पर्यंत वेटिंग लिस्टवर प्रवाशी आहेत. त्याच्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेची संख्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतलेला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments