आपलं शहर

Mumbai locldown : मुंबईत लॉकडाऊन लागला, या गोष्टी असतील सुरु; बाकी सगळं बंद…

सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक नेत्यांनी लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना चिंता वर्तवली जात आहे.

लॉकडाऊन लागल्याने अनेकांना नोकरी, व्यापार आणि रोजगार बुडण्याची चिंता वाटत आहे, तर अनेकांना दोन वेळेच्या जेवनाची चिंता भासत आहे, या सगळ्यात मुंबईची अवस्था नेमकी कशी असणार आहे, हेच पाहणे गरजेचे आहे. (What started in lockdown)

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने राज्य सरकारसह केंद्र सरकारचं मुंबईतील परिस्थितीवर लक्ष आहे. मुंबईतील कोणते व्यवसाय सुरु ठेवायचे आणि कोणते बंद, याकडेही लक्ष दिलं आहे. देशासह राज्याची आर्थिक घडी मुंबईतल्या लॉकडाऊनमुळे बिघडू शकते. (what closed in lockdown)

तब्बल 300 अब्ज इतकी मुंबईची जीडीपी असल्याने देशावर मोठं आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. सर्व्हिस इंडस्ट्री बंद पडल्यास देशाचं महिन्याला 16 हजार कोटींचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यताही अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, थिएटर, सलून, जीम, पार्लर, कपडे, चपला, खेळण्याची दुकाने, ज्वेलरी आणि फर्निचर्स स्टोअर्स या गोष्टी मुंबईत येत्या 30 एप्रिलपर्यंत बंद असणार असल्याचे राज्य सरकारने याआधीच स्पष्ट केले आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंटमधून फक्त पार्सलची सुविधा उपल्बध असल्याचंही त्या नियमांमध्ये नमुद आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून पार्सलची सुविधा सुरु केली जाईल. अनेकठिकाणी शिवभोजन थाळीची व्यवस्था केली असल्याने अनेकांच्या जेवनाचा प्रश्न यामुळे मिटणार आहे.

लॉकडाऊनमुळे रोजगारावर गदा

महाराष्ट्रासह आजूबाजूच्या अनेक राज्यातील नागरिक रोजगारासाठी मुंबईवर अवलंबून असतात. मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागल्याने अनेक गोष्टी बंद होतील, त्यामुळे अनेकांचे रोजगार जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तब्बल 30 लाख कर्मचारी हॉटेल व्यवसायामध्ये काम करत असल्याने अचानक या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. इतर इंडस्ट्रीजमधील कर्मचाऱ्यांनाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसू शकतो.

मुंबईत काय सुरु

अत्यावश्यक सुविधांची विक्री करणारी दुकाने, मॉल्स, सुपर मार्केट्स, डी मार्ट, भाजीपालाची दुकाने, दुध विक्री केंद्रे, मेडिकल्स आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी वाहतूक या लॉकडाऊनमध्ये सुरु असणार आहे. बड्या व्यवहारांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यादेखील सुरु राहण्याची शक्यता आहे.

पत्रकार, टपाल सेवा, अत्यावश्यक गोष्टींची सेवा पुरवणारी इकॉमर्स यंत्रणादेखील चालू असणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी लावला असला, तरी अनेक गोष्टी सुरु असल्याने कोणावरही उपासमारीची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

कोरोनाचे नियम पाळत वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने सुरु राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments